
अयुब खान अहमद खान पठाण यांना मा. महा महिम राष्ट्रपतीचे पदक घोषित करण्यात आले…
नाशिक पोलीस वार्ता :-
ऑगस्ट स्वातंत्र्य दिनानिमित्त होमगार्ड व नागरी संरक्षण दलात विशेष उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल मालेगाव पथकाचे समादेशक अधिकारी श्री अयुब खान अहमद खान पठाण सनत क्रमांक 15968 कंपनी नायक यांना मा . महा महिम राष्ट्रपतीचे पदक घोषित करण्यात आले आहे 1992 सालापासून होमगार्ड संघटनेत कार्यरत असून त्यांनी या संघटनेत दिलेल्या दीर्घ सेवेचे दिलेल्या योगदान व संघटनेच्या माध्यमातून सामाजिक राष्ट्रीय कार्य केलेली आहे या विशेष उल्लेखनीय केलेल्या कामाचे मूल्यांकन होऊन त्यांचा माननीय डॉक्टर श्री भूषण कुमार उपाध्याय महासमादेशक व माननीय प्रशांत कुमार उपमहासमाधीश होमगार्ड महाराष्ट्र राज्य मुंबई यांनी दाखल घेऊन त्यांच्या उचित सन्मान होण्याच्या दृष्टीने होमगार्डना प्रणित करण्याकरिता प्रस्ताव सादर केला होता.
15 ऑगस्ट 2023 दिनानिमित्त माननीय पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला व्यासपीठावर आमदार सीमा हिरे आरोग्यमंत्री भारतीय पवार माननीय पोलीस आयुक्त अंकुश शिंदे विशेष पोलीस महानिरीक्षक डॉक्टर बी जी शेखर ग्रामीण पोलीस अधीक्षक शहाजी उमाप अप्पर पोलीस अधीक्षक माधुरी केदार कांगणे खूप आयुक्त चंद्रकांत खांडवी उपस्थित होते