बौद्धाचार्य, उपासक प्रविण रत्ना सुरेश जाधवयांचा उत्कृष्ट सामाजिक कार्यकर्ता पुरस्काराने सन्मान!
रत्नदीप जाधव

ओझर ( मिग ) गावचे भुमिपुत्र बौद्धाचार्य, उपासक प्रविण रत्ना सुरेश जाधवयांचा उत्कृष्ट सामाजिक कार्यकर्ता पुरस्काराने सन्मान!
नाशिक पोलीस वार्ता :-
दि.५ ऑगस्ट २०२३ रोजी आदीश्री व बहुउद्देशीय शैक्षणिक व सामाजिक संस्था, नाशिक यांच्या वतीने
मिलिंद नगर (राजवाडा ) ओझर ( मिग ) ता – निफाड जि – नाशिक येथील बौद्धाचार्य. उपासक – प्रविण रत्ना सुरेश जाधव यांना उत्कृष्ट सामाजिक कार्यकर्ता पुरस्कार देऊन सन्मानित केले. सदर कार्यक्रमास संपुर्ण महाराष्ट्रातील विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. पाली भाषा आणि धम्मलिपी प्रशिक्षक तसेच सामाजिक आणि धम्म कार्यात कार्यात गेल्या २४ वर्षापासुन सक्रिय असुन.
या कार्याची दखल घेऊन हा पुरस्कार देण्यात आला.
आदर्श समाज सेवा पुरस्कार प्राप्त ( २०१८ )
बौद्धाचार्य – आयु. प्रविण रत्ना सुरेश जाधव
B.A. ( Economics ) M.A. ( Pali Language)
मो.नं.9325448915
पाली भाषा अभ्यासक
पाली आणि मराठी भाषेतील नाट्य कलाकार
लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड प्रमाणपत्र धारक – धम्मलिपी प्रशिक्षक
बुद्ध लेणी संवर्धक म्हणुन संपुर्ण महाराष्ट्रात कार्यरत आहेत.
गाईड – त्रिरश्मी बुद्ध लेणी नाशिक
Certificate & Lower Diploma Course in Pali Language*
Certificate Course in Buddhist Art & Architecture*
आता पर्यंत जवळपास १० हजारांच्या वर विद्यार्थ्यांना अशोककालीन आणि सातवाहकालीन धम्मलिपी Online व्हाट्सऍप ग्रुपच्या माध्यमातुन आणि प्रत्यक्षपणे विनामुल्य शिकवले आहे.
पुराभिभिलेख संचालनालय, महाराष्ट्र शासन प्रमाणपत्र धारक मोडी लिपी अभ्यासक
७ व्या शतकातील धारिणी संग्रह या नेवारी लिपीतील ग्रंथाचे देवनागरी लिपीत लिप्यांतर केले. आणि हा ग्रंथ राष्ट्रीय पांडू लिपी मिशन, दिल्ली, यांच्या तर्फे प्रकाशित झाला आहे. आणि सदर ग्रंथात माझे नाव देखील समविष्ट केले आहे.
भारतीय संविधानाची माहिती सर्वांना व्हावी. तसेच सर्वांना आपले हक्क, अधिकार आणि कर्तव्य समजावे. यासाठी भारतीय संविधाान प्रचारक आणि प्रसारक म्हणून कार्यरत आहेत.
संयुक्त लेणी परिषद नाशिक विभाग – सदस्य संचालक दान पारमिता फाऊंडेशन भारत सरकार नोंदणीकृत संस्था संस्थेच्या माध्यमातुन आदिवासी पाड्यावरील शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप केले जाते.
दर महिन्याच्या एका रविवारी महाराष्ट्रातील एका बुद्ध लेणी वर लेणी अभ्यास कार्यशाळा आयोजित केली जाते. यात लेणीचा संपुर्ण इतिहास सांगितला जातो.