
भुसावळ – शहरातील बाजारपेठ पोलीस स्टेशन
हे अति संवेदनशील म्हणून ओळखले जाणारे आहे.अशा या पोलीस स्टेशनने जळगांव जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकावल्याने पोलीस स्टेशनचे नाव हे उंचावले आहे. (ता.२३) रोजी पोलीस अधिकक्ष एम.राजकुमार यांच्याकडून बाजारपेठ पो.स्टे.चे दोन कर्मचाऱ्यांना सी.सी.टी.एन.एस.प्रणालीमध्ये उकृष्ठ कामगिरी केल्याबद्दल प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात येऊन पुरस्कार देण्यात आला.

पोलीस विभागाचा आधी संपूर्ण कारभार हाताने लिखाण करून गुन्हे केस डायरीत दाखल करावे लागत असत.मात्र तंत्रज्ञान युगात आता पोलीस विभाग पूर्ण पणे ऑनलाइन झाले आहे. घटनास्थळ पंचनामे,अटक पंचनामे,मुद्देमाल, दोषारोप पत्र,कोर्टाचे निकाल,गॅंग प्रोफाईल, प्रतिबंधक कारवाई,केस डायरी त्याचप्रमाणे विचारही पोलीस स्टेशनशी निगडित असलेली कामे माहे २०२३ महिन्यात सी.सी.टी.एन.एस प्रणालीमध्ये बाजारपेठ पोलीस स्टेशनचे पोहेकॉ.दिपक सुरेश कापडणे तसेच महेकॉ. आशा गणेश बावस्कर अशांनी पूर्ण पणे माहिती भरून उकृष्ठ कामगिरी केली.एवढेच नव्हे तर जळगांव जिल्ह्यातील जिल्ह्यापेठ पो.स्टे. जामनेर पो.स्टे.फैजपूर पो.स्टे.मुक्ताईनगर पो.स्टे. पारोळा पो.स्टे.मेहुणबारे पो.स्टे.कासोदा पो.स्टे.बाजारपेठ पो.स्टे.असे दहा पोलीस स्टेशन तसेच चौदा कर्मचाऱ्यांमधून प्रथम क्रमांक पटकाविला आहे.ही एक अभिमानाची बाब आहे असे बाजारपेठ पो.स्टे.चे पोहेकॉ. दिपक सुरेश कापडणे तसेच महेकॉ.आशा गणेश बावस्कर अशांना (ता.२३) रोजी जळगांव जिल्ह्याचे पोलीस अधिक्षक एम. राजकुमार यांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात येऊन पुरस्कार देण्यात आला.पुरस्कार मिळालेल्या पोलीस कर्मचाऱ्यांचे उपविभागीय पोलिस अधिकारी कृष्णात पिंगळे तसेच बाजारपेठ ठाण्याचे पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांच्याकडून अभिनंदन करण्यात आले.
अशा पुरस्काराने पोलीस कर्मचाऱ्यांना काम करण्यात एक स्फूर्ती निर्माण होईल.यापेक्षा ही कर्मचारी चांगले काम कसे करू शकतो या पुरस्कारा मागील पोलीस प्रशासनाचा मुख्य उद्दिष्ट आहे. यामुळे पोलीस कर्मचाऱ्यांमध्ये एक शक्ती निर्माण होणार आहे.जेणे करून आपणही एकेकाळी पुरस्कारांचे मानकरी ठरू शकू.
चौकट …
भुसावळ शहरातील शहर पोलीस स्टेशनचे पोकॉ.इस्त्राईल रफिक खाटीक व पोकॉ.विशाल सुरेश लाड अशांनी माहे २०२३ महिन्यात सी.सी.टी.एन.एस प्रणालीमध्ये उकृष्ठ कामगिरी करून जळगांव जिल्ह्यात दुसरा क्रमांक पटकावून पोलीस स्टेशनचे नाव उंचावल्याने ही एक अभिमानाची बाब आहे.
Tags
पुरस्कार