
नाशिक महानगरपालिका, नाशिक पाणी पुरवठा विभाग (यांत्रिकी) जाहिर निवेदन
नाशिक पोलीस वार्ता :-
नाशिक मनपाचे मुकणे रॉ वॉटर पंपींग स्टेशन येथे महावितरण कंपनीकडील सबस्टेशन मधील दुरुस्ती कामे करणे व 3३ केव्ही क्षमतेच्या उपकरणांची तपासणी करणे तसेच गंगापूर धरण रॉ वॉटर पंपींग स्टेशन येथील मीटरींग क्युबिकलचे नवीन आवश्यक दुरुस्ती कामे तातडीने करणे आवश्यक असल्याने महावितरण कंपनीकडील वीज पुरवठा शनिवार दि. 16/09/2023 रोजी सकाळी 9.00 ते सायंकाळी 5.00 वा. बंद ठेवावा लागणार असल्याने दि. 16/09/2023 रोजी संपूर्ण नाशिक शहरातील पाणी पुरवठा होणार नाही. तसेच दि. 17/09/2023 रोजी सकाळचा पाणी पुरवठा कमी प्रमाणात कमी दाबाने होईल याची नागरिकांनी नोंद घ्यावी व मनपास सहकार्य करावे ही विनंती.
अधीक्षक अभियंता (यां) नाशिक महानगरपालिका नाशिक.