
अलिबाग, मुरूड व रोहा तालुक्याला मध्यवर्ती ठिकाण असलेले रेवदंडा शहरातील बाजारपेठ ऐन गणेशोत्सवामध्ये नित्याने गर्दीची असते. आजूबाजूच्या विविध गावासह रेवदंडा, थेरोंडा, चौल, आग्राव आदी पंचक्रोशीतील ग्राहकवर्ग विविध खरेदीच्या निमित्ताने रेवदंडा बाजारपेठेत येतो. रेवदंडा बाजारपेठेतील अगोदरच अरूंद असलेल्या रस्ता या गर्दीने वाहनांची ये-जा करताना समस्या निर्माण करते. मुख्यः रस्ता अरूंद असल्याने पार्किंग समस्यासुध्दा निश्चितच जाणवते.