आपला जिल्हा

तलवारीने दहशत माजविणाऱ्या तरूणाला अटक

रवींद्र घ कोलते

मुक्ताईनगर – ।…..हातात तलवार घेऊन परिसरात दहशत माजविणाऱ्या तरुणाला मुक्ताईनगर पोलिसांनी वढवे येथून अटक केली असून त्याच्याकडून लोखंडी तलवार हस्तगत करण्यात आली आहे. या संदर्भात मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गोकुळ समाधान पाटील (वय-३६, रा. वढवे ता. मुक्ताईनगर) असे अटक केलेल्या संशयित तरुणाचे नाव आहे.

मुक्ताईनगर तालुक्यातील वडवे येथे शनिवारी १६ सप्टेंबर रोजी दुपारी २ वाजता संशयित आरोपी गोकुळ पाटील हा हातात तलवार घेऊन वढवे गावातील परिसरात दहशत निर्माण करून ग्रामस्थांमध्ये भीती निर्माण करत असल्याची गोपनीय माहिती मुक्ताईनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नागेश मोहिते यांना मिळाली. त्यानुसार त्यांनी पथकाला कारवाई करण्याच्या सूचना दिल्या. पथकातील पोलीस उपनिरीक्षक प्रदीप शेवाळे, पोलीस उपनिरीक्षक संदीप चेडे, पोलीस नाईक धर्मेंद्र ठाकूर, प्रशांत चौधरी, रवींद्र धनगर यांनी कारवाई करत दुपारी २ वाजता संशयित आरोपी गोकुळ समाधान पाटील याला अटक केली. तसेच त्याने त्याच्या गुरांच्या चारांमध्ये लपवून ठेवलेली तलवार हस्तगत करण्यात आली आहे.

याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल रवींद्र धनगर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून संशयित आरोपी गोकुळ पाटील यांच्या विरोधात मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.