
नांदगाव पोलीस स्टेशन मध्ये गणेशोत्सव व ईदच्या पार्श्वभूमीवर शांतता कमिटीची बैठक संपन्न
नांदगाव पोलीस वार्ता :-
आगामी येणाऱ्या काळात गणेशोत्सव आणि ईद उत्सव मिरवणुकीत पारंपारिक वाद्य वाजवावी तसेच गणपती मंडळाच्या सोबत 24 तास स्वयंसेवक नेमावे, मंडळांनी वीज वितरण कंपनी कडून अधिकृत कनेक्शन घ्यावे, कार्यकर्त्यांनी कायद्याच्या चौकटीत राहून गणेशोत्सव व ईद (ईद-ए-मिलाद) आणि सण उत्सवाच्या पार्श्वभूमीवर शांतता कमिटीची बैठक दिनांक 15 सप्टेंबर 2023 रोजी शुक्रवारी नांदगाव पोलीस ठाण्यामध्ये बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
या बैठकीत नांदगाव नगरपालिकेचे मुख्याधिकारी विवेक धांडे यांनी मार्गदर्शन करताना म्हटले की यावर्षी पाऊस कमी आहे. गणपतीच्या मोठ्या मूर्तीचे जतन करण्यात येणार असून लहान मूर्तींच्या विसर्जन करण्यासाठी नांदगाव नगरपालिकेच्या वतीने शिवस्तुतरती चौकात कृत्रिम तलाव करण्यात येणार आहे. ज्या मंडळावर कार्यवाही झाली नाही. अशा मंडळांना दहा वर्षे परवानगी मिळणार आहे. लहान मूर्तींच्या विसर्जनासाठी पाऊस कमी असल्याने कृत्रिम कृत्रिम तलाव तयार केला जाणार असल्याची माहिती दिली. तसेच मिरवणुकीच्या मार्गातील अडथळे दूर करणार असल्याचेही सांगितले.
नांदगाव तहसील कार्यालयाचे तहसीलदार डॉक्टर सिद्धार्थ मोरे यांनी सांगितले की गणेश मंडळांना प्रशासनाचे सर्व सहकार्य मिळेल. नांदगाव पोलीस स्टेशनचेह पोलीस निरीक्षक प्रीतम चौधरी यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, जय गणपती मंडळे सामाजिक संदेश देणारे देखावे करतील अशा कामाची पोलीस स्टेशनचे अधिकारी पाहणी करून उत्कृष्ट कार्यक्रम घेणाऱ्या मंडळांना नांदगाव पोलीस ठाण्यातर्फे आदर्श गणेशोत्सव मंडळाला प्रशस्तीपत्र बक्षीस देऊन गौरविण्यात येईल. मंडळांनी सामाजिक उपक्रम राबवावे असे आवाहन केले.
तर नांदगाव नगरपालिकेचे माजी नगर अध्यक्ष राजेश (बबी) कवडे म्हणाले की यावर्षी दुष्काळी परिस्थिती असून मंडळांनी ज्यादा खर्च करू नका. खर्चाच्या बचत मधून भविष्यात पाण्याच्या कामावर खर्च करून सामाजिक बांधिलकी जपावी अशी अपेक्षा व्यक्त केली. नांदगाव तालुका व्यापारी संघटनेचे बाळासाहेब कवडे, वाल्मीक जगताप, संदीप जेजुरकर यांनी देखील आपले मनोगत व्यक्त केले.
यावेळी नांदगाव तहसील कार्यालयाचे तहसीलदार डॉक्टर सिद्धार्थ मोरे, नांदगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रीतम चौधरी, नांदगाव नगर परिषदेची मुख्याधिकारी विवेक धांडे, नांदगाव नगरपालिकेचे कर निरीक्षक राहुल कुटे, नांदगाव नगरपालिकेची माजी नगराध्यक्ष राजेश कवडे, पोलीस सहाय्यक निरीक्षक नितीन खंडागळे, पोलीस उपनिरीक्षक मनोज वाघमारे, उपनिरीक्षक संतोष बहाकर, हवालदार राजू मोरे, गोपनीय शाखेचे आमदार दत्ता सोनवणे, महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीचे सहाय्यक अभियंता डी डी पाटील व नांदगाव पत्रकार संघाचे अध्यक्ष सुरेश शेळके, नरेंद्र पाटील, याकूब शेख वंचित बहुजन आघाडीचे वाल्मीक जगताप, सामाजिक कार्यकर्ते सिद्धार्थ पवार, मुस्ताक शेख, नसीर शेख, वाल्मीक पवार, कपिल तेलोरे, कलीम शेख आदी उपस्थित होते.