महाराष्ट्र

सांगलीमध्ये मराठा मोर्चास उत्स्फूर्त प्रतिसाद.

रत्नदीप जाधव

सांगलीमध्ये मराठा मोर्चास उत्स्फूर्त प्रतिसाद. लाखोंची गर्दी.

सांगली पोलीस वार्ता :

रविवार दि.१७.सरकारकडून मराठा समाजावर होत असलेल्या अन्याया विरुद्ध न्याय मागण्यासाठी आणि मराठा समाजाच्या विविध मागण्यानसाठी रविवार दिनांक १७ नोव्हेंबर २०२३. सांगली मध्ये सांगली जिल्हा मर्यादित मराठा समाजाने महामोर्चाचे महा आयोजन केले होते. सांगलीमध्ये संपन्न झालेल्या या महामोर्चात लाखोच्या संख्येने मराठी बांधव आणि इतर समाजातील हितचिंतक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

याप्रसंगी महाराष्ट्रातील सत्ताधारी पक्षातील दिग्गज नेते आणि कार्यकर्ते सुद्धा मोठ्या संख्येने यात उपस्थित होते.

यावेळी खासदार संजय काका पाटील. महाराष्ट्राचे कामगार राज्यमंत्री आणि सांगली जिल्ह्याचे पालक सुरेश भाऊ खाडे. आमदार सुधीर दादा गाडगीळ. माजी आमदार नितीन राजे शिंदे. शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे गुरुजी. सांगली, मिरज आणि कुपवाड महानगरपालिकेचे माजी महापौर धीरज सूर्यवंशी. शेखर इनामदार. करंद देशपांडे. माजी आमदार आणि माजी राज्यमंत्री अजित दादा घोरपडे. (सरकार) यांची विशेष उपस्थिती होती.
यावेळी महाआघाडीचे माजी अर्थमंत्री जयंत रावजी पाटील. मराठा सेवा संघाचे सर्व सन्माननीय पदाधिकारी तसेच मराठा मंडळ समाजाचे सर्व पदाधिकारी आणि ब्रिगेडचे सर्व पदाधिकारी. जिजाऊ ब्रिगेडच्या सर्व पदाधिकारी मराठा समाजाचे सर्व क्षेत्रातील मान्यवर आणि मराठा बांधव तसेच सर्व हितचिंतक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मराठा मोर्चा ची सुरुवात ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक माधवराव माने यांच्या शुभहस्ते थोर स्वातंत्र्य सेनानी नाना पाटील यांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून आणि मराठा मोर्चा ची ज्योत प्रज्वलित करून झाली.
मराठा समाजाच्या या मोर्चासाठी उपस्थित असलेल्या बंधू-भगिनींना मराठा समाजातील स्वयंसेवक आणि दानशूर लोकांनी पाणी आणि नाश्त्याची उत्तम सोय केलेली होती.मराठा समाजाच्या या मोर्चाची महाराष्ट्र शासनाने योग्य दखल घेऊन त्यांच्या सर्व न्याय मागण्या मान्य कराव्यात ही मराठा समाजाची त्यांना कळकळीची विनंती आहे.

✍️पोलीस वार्ता संपादक/ व्यवस्थापक :-                                                 उमेश फिरके, नाशिक.
📲मो.नं.9637519059
✍️पोलीस वार्ता कार्यकारी संपादक :-                                                    रत्नदीप जाधव, नाशिक.
📲मो.नं.9326803590
SHARE

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.