आपला जिल्हा

प्लास्टिक बंदी ; मिळून आल्यास दंडास पात्र !

पोलीस वार्ता टीम

भुसावळ – शहरातील सर्व नागरिक,दुकानदार, व्यापारी वर्ग यांना याद्वारे कळविण्यात येते कि, महाराष्ट्र शासन, नगरविकास अभियान संचालनालय,मुंबई यांचे दिनांक ०१/१०/२०२१ रोजीचे पत्रानुसार केंद्र शासनाच्या पर्यावरण वन व हवामान परिवर्तन मंत्रालयाद्वारे पर्यावरण संरक्षण अधिनियम १९८० ला अनुसरून प्लास्टिक कचरा व्यवस्थापन नियम २०१६ अधिसूचित करण्यात आले आहेत. यामधील प्रथम सुधारणा नियम दिनांक १२/०८/२०२१ नुसार लागू केले असून ७५ मायक्रोन पेक्षा कमी जाडीचे तसेच सिंगल युज प्लास्टिक पिशवी वर बंदी घालण्यात आली आहे.यासंदर्भात नगरपरीषदेच्या वतीने नोटीस जाहीर केलेली आलेली असून यानंतर ही विक्री करतांना मिळून आल्यास दंडास पात्र असणार अशी माहिती उपविभागीय अधिकारी तथा नगरपरिषद प्रशासकीय अधिकारी जितेंद्र पाटील यांच्या माध्यमातून नोटीस व्दारे कळविण्यात आली आहे.

तसेच महाराष्ट्र शासनाच्या महाराष्ट्र विघटनशील व अविघटनशील कचरा ( नियंत्रण) कायदा २००६ ला अनुसरून महाराष्ट्र प्लास्टिक व थर्माकोल अविघटनशील वस्तूंचे (उत्पादन, वापर,विक्री,वाहतूक हाताळणी, साठवणूक) नियम अधिसूचना तरतुदी अन्वये राज्यात विविध प्रकारच्या प्लास्टिक वापरावर बंदी लागू करण्यात आली आहे.
तरी भूसावळ शहरातील सर्व नागरिक/दुकानदार/व्यापारी वर्ग यांना याद्वारे सूचित करण्यात येते कि, उपरोक्त नियमाचे अधिसुचनांचे कठोर अंमलबजावणी शहरांमध्ये सुरु करण्यात आलेली आहे. तरी भूसावळ शहरातील सर्व नागरिक / दुकानदार / व्यापारी वर्ग किरकोळ विक्रेते यांना याद्वारे सूचित करण्यात येते कि, ७५ मायक्रोन पेक्षा कमी जाडीचे तसेच सिंगल युज प्लास्टिक यांच्या वापरावर पूर्णताः बंदी घालण्यात आली आहे. ज्या नागरिक / दुकानदार/व्यापारी वर्ग, किरकोळ विक्रेते यांचेकडे ७५ मायक्रोन पेक्षा कमी जाडीचे तसेच सिंगल युज प्लास्टिक आढळल्यास त्यांचेवर प्रथम वेळेस रक्कम रुपये ५०००/- द्वितीय वेळेस आढळल्यास रक्कम रुपये १०,०००/- /- तृतीय वेळेस आढळल्यास रक्कम रुपये २५,०००/- मात्र आणि ३ महिन्याचा कारावास अश्या प्रकारे कायदेशीर कारवाई करण्यात येईल,
SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.