आपला जिल्हा
गणेशोत्सव मंडळांकडून वीज चोरीवर आळा बसवून झाडांची ट्रिमींग करा – जितेंद्र पाटील
पोलीस वार्ता टीम

भुसावळ – शहरातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांकडून होणाऱ्या वीजचोरीवर आळा घालून मुख्य मिरवणूक मार्गावरील झाडांची ट्रिमींग करणेबाबत उपविभागीय अधिकारी तथा नगरपरिषद प्रशासकीय अधिकारी जितेंद्र पाटील यांच्या अध्यक्षतेखाली न.पा. मुख्याधिकारी महेश वाघमोडे तसेच कार्यकारी अभियंता,महाराष्ट्र राज्य विद्युत महामंडळ यांची बैठक घेऊन वीज चोरीवर आळा बसवून झाडांची ट्रिमींग करण्याबाबत सूचना दिल्या.
याबाबत भुसावळ शहरातील विविध भागांत शहरातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांमार्फत शहरातील विविध ठिकाणी गणेश मुर्तीची स्थापना करणेत येऊन मंडळांमार्फत श्री गणेशाचे आरास निर्माण करून त्याठिकाणी विद्युत रोषणाई करण्यात येण्याची तसेच ध्वनिक्षेपक लावण्यात येण्याची दाट शक्यता आहे.
सदरील मंडळांमार्फत करणेत येणाऱ्या सदरच्या विद्युत रोषणाईसाठी,ध्वनिक्षेपकांच्या व्यवस्थेसाठी तसेच श्री गणेश आरासाच्या सजावटीसाठी शहरातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांकडून कुठल्याही प्रकारची विजचोरी होणार नाही याची दक्षता आपले स्तरावरून घेण्यात येऊन मंडळांमार्फत होणाऱ्या विजचोरीवर आळा घालण्यासाठी योग्य ते निर्बंध तत्परतेने आपले स्तरावरून लावण्यात यावेत.जेणेकरून विजचोरीच्या प्रकरणांमुळे अकाळी विजपुरवठा खंडीत होण्यावर तसेच विजचोरीमुळे काही एक अनुचित प्रकार घडण्यावर आळा घालणे सोईचे होईल.
तसेच श्री गणेश मुर्ती विसर्जनाच्या दिवशी विसर्जन मिरवणूकीच्या शहरातील मुख्य मिरवणूक मार्गातील विजेच्या तारांना स्पर्श करणाऱ्या सर्व झाडांची ट्रिमींग करण्याची कार्यवाही आपले स्तरावरून तातडीने करण्यात यावी.जेणेकरून विसर्जन मिरवणुकीच्या वेळी विजेच्या तारांना स्पर्श करणाऱ्या झाडांमुळे विजपुरवठा खंडीत होऊन मिरवणूकीच्या मार्गक्रमणात बाधा निर्माण होणार नाही.
सदरच्या श्री गणेश उत्सवा दरम्यान गणेश मंडळांकडून होणाऱ्या विजचोरी प्रकरणांमुळे काही एक अनुचित प्रकार घडल्यास तसेच विजपुरवठा खंडीत होऊन गणेश विसर्जन मिरवणूकीत काहीएक बाधा निर्माण झाल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी भुसावळ शहर विद्युत पुरवठा व विद्युत नियंत्रण यंत्रणा या नात्याने आपणांवर राहील याची नोंद घ्यावी असे भुसावळ नगरपरिषद यांच्या वतीने कार्यकारी अभियंता,महाराष्ट्र राज्य विद्युत महामंडळ,भुसावळ यांना कळविली आले आहे.