
भुसावळ – शहरातील सर्व गणेश मंडळांनी गणेशोत्सवा निमित्त स्थापने पासून तर गणेश विसर्जना पर्यत दहा दिवसांत दहा कार्यक्रम राबविण्याचे आव्हाहन उपविभागीय अधिकारी जितेंद्र पाटील यांच्या माध्यमातून करण्यात आले आहे.
समाज सुधारकांचे उद्देश डोळ्यासमोर ठेवून गणेश मंडळांनी विचित्र गाणे न वाजविता देवतांची गाणे वाजवा. डी.जे.वाजविण्याची काय गरज आहे यामुळे होणारे ध्वनी प्रदूषण टाळा व मंगलमय वाद्य हळू आवाजात वाजवा. त्याचप्रमाणे फटाके,गुलाल यांचा वापर करू नये. नागरिकांमध्ये वाचन कैशल्य वाढविण्यासाठी उपक्रम राबवा.रक्तदान शिबिर,आरोग्य तपासणी तसेच सांस्कृतिक उपक्रम राबवा असे आवाहन उपविभागीय अधिकारी जितेंद्र पाटील यांच्या माध्यमातून सर्व गणेश मंडळांना करण्यात आले आहे.
शहरात स्वच्छतेवर भर…
गणेश स्थापने दरम्यान शहरात स्वच्छतेवर मोठ्या प्रमाणात भर देण्यात येईल.तसेच सर्व गणेश मंडळांचे दैनंदिन निर्माल्य जमा झालेले विल्हेवाट लावण्यासाठी नगरपरिषदेच्या माध्यमातून स्वतंत्र वाहनांची व्यवस्था करण्यात आलेली आहे.याच बरोबर घरगुती गणेश स्थापना करण्यात आलेल्या भक्तगणांनी सुद्धा आपले निर्माल्य दररोज वाहनात टाकावे.जने करून शहर स्वच्छ राहील.
Tags
गणेश आगमन