आपला जिल्हा
सनातन हिंदू धर्माचे अपमान करणाऱ्या नेत्यांविरुद्ध कायदेशीर कारवाई व्हावी – प्रातांना निवेदन
पोलीस वार्ता टीम

भुसावळ – शहरातील व्यापारी मंडळाचे पदाधिकारी, सदस्यगण, भुसावळ नगरीचे समाजसेवक व हिंदू धर्माभिमानी नागरिक तसेच विधी तज्ञ यांच्या माध्यमातून सनातन धर्माचे अपमान करणाऱ्या तामिळनाडूचे मंत्री उदयनिधी स्टालिन, डी.एम.के. चे नेते ए. राजा तसेच बिहारचे मंत्री चंद्रशेखर सिंग, उत्तर प्रदेशचे समाजवादी पक्षाचे नेते स्वामीप्रसाद मौर्य तसेच इतर अन्य नेत्यांविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात व्हावी यासाठी उपविभागीय अधिकारी( प्रांत) जितेंद्र पाटील यांना निवेदन देण्यात आले.
देशात 80% सनातन धर्मावलंबी असून सुद्धा सनातन हिंदू धर्माविरुद्ध दांभिक पुरोगामी नेते मंडळी हे नेहमी फक्त हिंदू धर्माला लक्ष करून हिंदू धर्मावर टीका करीत अपमान करीत असतात व कधीही हिंदू धर्मविरुद्ध काहीही कारण नसतांना ते हिंदू धर्मावर तुटून पडतात. सध्याच्या काळात निवडणुकीच्या निमित्ताने तामिळनाडूचे मंत्री उदयनिधी स्टालीन, डी.एम.के. चे नेते ए. राजा तसेच बिहारचे मंत्री चंद्रशेखर सिंग, उत्तर प्रदेशचे समाजवादी पक्षाचे नेते स्वामी प्रसाद मौर्य व इतर अन्य नेते काही एक कारण नसतांना सनातन हिंदू धर्माचे अपमान करीत असून सनातन हिंदू धर्म संपवण्याची गोष्ट करीत आहे. तसेच हिंदू धर्मातील पवित्र ग्रंथाबद्दल अपमान जनक वक्तव्य जाहीरपणे करीत आहे. या सर्व नेते मंडळींना हिंदू जनतेच्या भावनेचा तसेच कायद्याचे काही एक भय नाही.तसेच यांचे वक्तव्यास काही एक आधार नाही. जगात प्रत्येक धर्मात काही ना काही अनिष्ट प्रथा परंपरा आहे. परंतु सनातन हिंदू धर्माचे अशा अनिष्ट रूढी परंपरा नष्ट करण्यास सर्वात आधी पुढाकार घेतलेला आहे. तसेच वैज्ञानिक दृष्टीने पुढे जाणार एकमेव धर्म असून याच कारणामुळे पृथ्वीतलावर पूर्ण वैभवाने नवनवीन धर्मासमोर दृढतेने उभा असून सनातन हिंदू धर्माचे कधीच कोणत्याही धर्माचा विरोध केलेला नाही.अशा सनातन हिंदू धर्माचे काहीही एक कारण नसतांना अपमान करीत सनातन हिंदू धर्म संपवण्याच्या गोष्टी करीत आहे.अशा सर्व पुरोगामी नेतेमंडळी विद्यमान कायद्याने कायदेशीर कारवाई करण्यात यावी असे शासनाने आदेश द्यावे.याकरिता मा.प्रंतप्रधान व गृहमंत्री भारत सरकार यांच्या माध्यमातून कारवाई करण्यात यावी यासाठी उपविभागीय अधिकारी भुसावळ भाग भुसावळ जितेंद्र पाटील यांच्या मार्फत निवेदन देण्यात आले आहे.निवेदनावर अँड.दिलीप जोनवाल, अँड. मनिष कुमार वर्मा,अँड.जितेंद्र भतोडे, अँड.महेश चौधरी, अँड.किशोर राजपूत अशांची सह्या आहेत.
Tags
निवेदन