आपला जिल्हा

बाजारपेठ ठाण्याचे प्रशांत परदेशी “पोलीस स्टेशन एम्प्लॉई ऑफ द मंथ” ने सन्मानित

प्रतिनिधी कालू शहा

भुसावळ- उपविभाग अंतर्गत पोलीस स्टेशनकडील पोलीस अंमलदार यांना त्यांचे पोलीस सेवेतील उपविभागीय पोलीस अधिकारी कृष्णात पिंगळे यांच्या माध्यमातून उत्कृष्ट कामगिरी बद्दल दरमहा बक्षीस देवून गौरव करणेचे माहे – ऑगेस्ट २०२३ अखेर पासुन नियोजित केले आहे.पोलीस अधीक्षक, जळगांव श्री.एम.राजकुमार,अप्पर पोलीस अधीक्षक जळगांव मा. श्री. चंद्रकांत गवळी,यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस ठाणेमध्ये उत्कृष्ट काम करणारे पोलीस अंमलदार यांचे कौतुक करण्यासाठी तसेच त्यांचेमध्ये सांघिक भावना निर्माण व्हावी व दैनंदिन कामकाजामध्ये उत्कृष्ट काम करण्याची प्रेरणा निर्माण करणेसाठी ” पोलीस स्टेशन एम्प्लॉई ऑफ द मंथ” ही संकल्पना भुसावळ उपविभाग अंतर्गत राबविण्यात येत आहे.

भुसावळ उपविभागातील पोलीस ठाणेकडे माहे जुलै २०२३ या महिन्यामध्ये सर्वोत्कृष्ट काम करणाऱ्या पोलीस अंमलदार यांची निवड उपविभागातील पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी कृष्णात पिंगळे यांच्या माध्यमातून करण्यात आली.

सदर पोलीस अंमलदार यांचे नाव “पोलीस स्टेशन एम्प्लॉई ऑफ द मंथ ” म्हणुन देण्यात येईल. निवड झालेल्या अंमलदार यांची उपविभागाकडील क्राईम आढावा बैठकीमध्ये पुष्पगुच्छ व उत्कृष्ट कामगिरीबद्दल प्रमाणपत्र देवून कौतुक केले तसेच संबंधीत अंमलदार यांना प्रत्येकी १०००/- प्रोत्सहनपर बक्षीस मिळणे बाबत मा. पोलीस अधीक्षक, जळगांव यांचे कार्यालयात सादर करण्यात आले आहे. सदर अंमलदार नाव व फोटो पोलीस ठाणेचे दर्शनी भागावर “पोलीस स्टेशन एम्प्लॉई ऑफ द मंथ” या मथळयाखाली प्रदर्शित करणेबाबत नियोजित केले आहे. तसेच उपविभागातील सर्व ” पोलीस स्टेशन एम्प्लॉई ऑफ द मंथ ” मानकऱ्यांचा एकत्रित फोटो उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय येथील दर्शनी भागात लावण्यात येईल. माहे – सप्टेंबर २०२३ मध्ये दि. १८.०९.२०२३ रोजी आयोजित गुन्हे बैठकी दरम्यान भुसावळ बाजारपेठ पोलीस स्टेशनचे पोकॉ.प्रशांत रमेश परदेशी यांनी एमपीडीए मधील आरोपी पळून गेला होता त्याचे लोकेशन व सीडीआर मिळून न येता तरी सुध्दा गोपनिय माहिती काढून आरोपीस पकडले म्हणून उल्लेखनिय कामगिरी केली आहे. भुसावळ बाजारपेठ पो.स्टे. हद्दीत गुन्हे (घरफोड चोरी)उघडकीस आणले तसेच गुन्हे प्रकटीकरण केले म्हणून उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल “पोलीस स्टेशन एम्प्लॉई ऑफ द मंथ” पुरस्काराने गौरविण्यात आले.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.