आपला जिल्हा

सुभाष भाऊलाल वारडे राज्य राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्काराने सन्मानित

पोलीस वार्ता टीम

चोपडा प्रतिनिधी…तालुक्यातील चहाडी येथील मूळ रहिवासी व हल्ली महालक्ष्मी नगर चोपडा शहरात राहणारे कोळंबा उच्च माध्यमिक प्राथमिक शाळेचे शिक्षक सुभाष भाऊलाल वारडे यांना राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. अविष्कार सोशल अँड एज्युकेशनल फाउंडेशन इंडिया रायगड जिल्हा शाखेने त्यांना गौरविले आहे. रायगड कोकण येथे रविवार १७ सप्टेंबर रोजी प्राध्यापक डॉक्टर संतोष भोसले महाराष्ट्र ( प्रदेशाध्यक्ष) कोकण विभागीय अध्यक्ष माननीय संदीप नागे रायगड जिल्हा अध्यक्ष शंकर शिंदे गुरुजी व संजय पवार संस्थापक अध्यक्ष यांच्या प्रमुख उपस्थितीत वारडे गुरुजींना सपत्नीक शाल श्रीफळ प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले सुभाष भाऊलाल वारडे यांनी शिक्षण क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्याचे सर्वत्र कौतुक होत असून ते राज्यात गौरविलेले छायाचित्रकार छोटू वारडे यांचे ज्येष्ठ बंधू आहेत.

प्रतिनिधी -चोपडा तालुका/ विनायक पाटील

SHARE

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.