
दहिवड येथील दिलीप सोनवणे यांची नाशिक जिल्हा समता परिषद सरचिटणीस पदी निवड
दहिवड पोलीस वार्ता :-
देवळा तालुक्यातील दहिवड येथील सामाजिक कार्यकर्ते दिलीप शिवाजी सोनवणे यांची महात्मा फुले समता परिषद नाशिक जिल्हा पूर्व विभाग च्या सरचिटणीस पदी नियुक्ती नुकतीच राज्याचे मंत्री छगनराव भुजबळ यांच्या हस्ते पत्र देऊन एका कार्यक्रमात करण्यात आली यामुळे परिसरातील नागरिकांनी सोनवणे यांचे अभिनंदन केले व भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या. दिलीप सोनवणे हे प्रत्येक कार्यात अग्रेसर असतात तसेच राजकीय सामाजिक बांधिलकी जोपासत असल्यामुळे त्यांना हे पद मिळाले आहे.