
भुसावळ – शहरातील बाजारपेठ पोलीस स्टेशन हद्दीतील पाच वर्षांपूर्वी चोरी झालेल्या मोटारसायकल प्रकरणातील तीन संशयितांच्या बाजारपेठ पोलिसांनी मुसक्या आवळून त्यांच्या ताब्यातून चोरीच्या नऊ मोटरसायकल जप्त केल्या आहेत.
याबाबत बाजारपेठ पोलीस स्टेशनचे निरीक्षक बबन आव्हाड यांना गोपनीय माहिती मिळाली की, कोरोना महामारीच्या काळात काही तरुणांनी मोटरसायकल चोरी करून विक्री केली आहे.त्यातील संशयित भुसावळ शहरात आल्याचे खात्रीशीर माहिती मिळाल्याच्या आधारे गुन्हे शोध पथकातील कर्मचाऱ्यांना तात्काळ घटनास्थळी रवाना करून संशयित आरोपी मोईद शेख अजीज ( वय २५) वर्षे, रा. खडका रोड, रजा नगर, भुसावळ, शेख रेहान शेख रशिद, (वय २८) वर्षे, रा.अयान कॉलनी, गेट नं. २, रेणुका माता मंदीर जवळ,भुसावळ. सैयद अक्रम सैय्यद हातम (वय २३) वर्षे, रा. माटरा गाव,ता.शेगाव,जि. बुलढाणा यांना ताब्यात घेवुन मोटार सायकल चोरी गुन्हयाबाबत विचारपूस केली असता तसेच “खाकी” दाखविताच त्यांनी संगणमताने भुसावळ बाजारपेठ आणि भुसावळ शहर तसेच फैजपुर पो.स्टे. ला दाखल असलेल्या गुन्हयाची कबुली देवुन त्यांचेकडुन एकुण नऊ मोटार सायकल जप्त करण्यात आले आहेत.
सदरची कारवाई पोलीस अधिक्षक.एम राजकुमार,अप्पर पोलीस अधिक्षक .चंद्रकांत गवळी,उपविभागीय पोलीस अधिकारी कृष्णात पिंगळे यांचे मार्गदर्शनाखाली भुसावळ बाजारपेठ पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक बबन आव्हाड, गुन्हे शोध पथकाचे सहा.पो.निरी. हरीष भोये, पोलीस उपनिरीक्षक मंगेश जाधव, पोहेकॉ सुनिल जोशी,विजय नेरकर, रमण सुरळकर, यासीन पिंजारी महेश चौधरी, उमाकांत पाटील, निलेश चौधरी, पोकॉ सचिन चौधरी, जावेद शहा, प्रशांत परदेशी,योगेश माळी, प्रशांत सोनार, प्रणय पवार अशांनी मिळून केली.,