आपला जिल्हा

भुसावळ महसूलचा दणका ; तीन मोबाईल टॉवर सिल !

पोलीस वार्ता टीम

भुसावळ – शहरातील मोबाईल टॉवर कंपनीला वाणीज्य अकृषक वापरा बाबत महसुल विभाग कडून वसुली इंष्टाक पुर्ती करणेकामी दंड वसुली नोटीस बजविण्यात आल्यानंतरही पन्नास लाख रुपये थकबाकी न भरल्याने (ता.५) रोजी महसूल विभागाने दणका देत तीन मोबाईल टॉवर सिल केले.
याप्रकरणी महसूल विभागाने (ता.५) रोजी सन २०२३-२०२४ या वर्षांचा महसुल वसुली इंष्टाक पुर्ती करणेकामी अकृषिक सारा ५० लाख थकबाकी असुन,थकबाकी असलेल्या मोबाईल टॉवर कंपनीने वाणीज्य अकृषक वापर दंडबाबतचे वसुली मागणी नोटीस देऊन देखील विहीत मुदतीत महसुल वसुलीच्या रक्कमा न भरल्यामुळे भुसावळ महसुल विभागाचा कार्यवाहीचा दणका भुसावळ शहरातील इडंस, रिलायन्स (जिओ) व ओटीसी कंपनीचे 3 मोबाईल टॉवर आज रोजी मंडळ अधिकारी भुसावळ, तलाठी शहर भुसावळ व तलाठी साकेगांव यांचे मार्फत सिल करणेत आले ज्या मोबाईल कंपनीने विहीत मुदतीत सदर महसुल वसुलीच्या रक्कमा न भरल्यास आणखी मोबाईल टॉवर सिल करणेची कार्यवाही करणेत येणार आहे.
तसेच सर्व अकृषक (एन.ए.) प्लॉट धारक थकबाकी धारकांनी देखील थकबाकीसह सन २०२३-२०२४ च्या महसुल शेतसारा रक्कमा न भरल्यास म.ज.म.अ.१९६६ चे कलम १७६ ते १७९ अन्वये प्लॉट धारकांच्या मिळकतीच्या ७/१२ वर जप्तीबोजे बसविणे मिळकतीवर सरकार नाव लावणे बाबत कायदेशी कार्यवाही करणेत येईल याची नोंद घ्यावी तरी सर्व प्लॉट धारकांना महसुल प्रशासनाच्या वतीने आव्हान करणेत येते की, सदर सर्व अकृषक (एन.ए.) प्लॉट धारकांनी आपले कडील थकबाकीसह सन २०२३-२०२४ वर्षाच्या चा अकृषक शेतसारा तात्काळ तलाठी कार्यालयातुन जाऊन विहीत मुदतीत भरणा करावा जेणे करून पुढील प्रसंग टळेल व ग्राहकांची गैरसोय ही होणार नाही.
सदर कारवाई प्रफुल्ल कांबळे,मंडळ अधिकारी भुसावळ, पवन नवगाळे तलाठी भुसावळ शहर, मिलींद तायडे, तलाठी साकेगांव यांनी केलेली आहे.
SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.