आपला जिल्हा

गुटखा कारवाई ….. लाखोंचा मुद्देमाल जप्त; चार दुकानांना सील तर चार जण ताब्यात

पोलीस वार्ता टीम

चोपडा प्रतिनिधी – गुप्त माहिती वरून चोपड्यात आज अन्न व औषध प्रशासनाचे पथकाने अवैधरित्या गुटखा शोधण्यासाठी आले असता अन्न व औषध प्रशासनाचे जळगाव, धुळे, नाशिक येथील मिळून तीन वेगवेगळे पथक तयार करून चोपडा शहरात वेगवेगळ्या ठिकाणी धडक टाकण्यात आली यात लाखोंचा माल जप्त करण्यात आला.

सविस्तर असे की, शहरातील दर्शन पान सेंटर,प्रो. किशोर चौधरी यांच्या कडे अवैधरित्या गुटखा करताना मुद्देमाल जप्त 1970 रुपयेचा मुद्देमाल जप्त करण्यात आला गुरुकृपा प्रोव्हिजन प्रो. दयानंद अमरलाल सिंधी यांच्याकडे 51207 रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.महादेव स्वीट,प्रो. धनराज रूपचंद गेही यांच्याकडे 55602 रुपयेचा मुद्देमाल जप्त करण्यात आला नवलचं झंननालाल जैन यांच्या गोडावून मध्यें 58479 रुपयेचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ह्या चौघे आरोपींना ताब्यात घेण्यात आले आले तसेच यांच्या गोडावून व दुकानांना सील करून दिले आहे. असे एकूण 1 लाख 67 हजार रुपयांचा माल जप्त करण्यात आला आहे.

जॉईन कमिशनर नाशिक डिव्हिजन, एस .बी नारागुडे,
असिस्टंट कमिशनर नाशिक उदय लोहकरे,असिस्टंट कमिशन जळगाव संतोष कांबळे,फूड सेफ्टी ऑफिसर धुळे के एच बाविस्कर,फूड सेफ्टी ऑफिसर जळगाव एस एम पवार,फूड सेफ्टी ऑफिसर नंदुरबार बेबी पवार,फूड सेफ्टी ऑफिसर नाशीक जी.व्हि कासार,फूड सेफ्टी ऑफिसर नाशिक यु.आर सूर्यवंशी,वाय आर देशमुख, आदी पथकात सामील होते.

प्रतिनिधी चोपडा तालुका विनायक पाटील

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.