महाराष्ट्र

धुळे शहरातील कचरा डेपो, मोकाट जनावरे, पिसाळलेल्या कुत्र्या संदर्भात धुळे महानगरपालीकेच्या आयुक्तांना निवेदन

विनायक हरळ

धुळे युवासेना महानगराच्या वतीने धुळे शहरातील कचरा डेपो तसेच मोकाट जनावरे व पिसाळलेल्या कुत्र्या संदर्भात धुळे महानगरपालिकेचे आयुक्त श्रीमती अमिता दगडे पाटील यांना निवेदन

धुळे पोलीस वार्ता :-

धुळे शहरात गेल्या अनेक वर्षापासून कचरा डेपो हा विषय खूप गंभीर होत चालला आहे धुळे शहरातील जुने धुळे परिसर डोंगरे महाराज नगर व वरखेडे रोड मनमाड जीन, कॉटन मार्केट एरिया या भागातील लोकांना या कचरा डेपो मुळे नरक यातना भोगाव्या लागत आहेत या कचरा डेपो मध्ये वारंवार आग लागते या आगीमुळे विषारी द्रव्य वायू हवेतून बाहेर पडतात त्यामुळे वायू प्रदूषणात खूप मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे त्यामुळे वरील भागातील लोकांना श्वासाचे विकार निर्माण झाले आहे. बायोमायनिंग प्रक्रिया अत्यंत धिम्या गतीने चालू असून ती जलद गतीने करण्यात यावी गांडूळ खत प्रकल्प येथे एमआरएफ सेंटरचे ५ शेड तयार आहेत तिथे विलगीकरणाची प्रक्रिया जलद गतीने करण्यात यावी व वारंवार लागणाऱ्या आगीला आटोक्यात आणण्यात यावे त्यामुळे वायू प्रदूषणात अटकाव निर्माण होईल. कचरा डेपोच्या बाहेर टाकण्यात येणारा कचरा हा कचरा डेपोच्या संरक्षण भिंतीच्या आत मध्ये टाकण्यात यावा कचरा डेपोच्या संरक्षण भिंतीच्या उंची वाढवण्यात यावी. व हा काचरा डेपो लोकवस्ती पासून दूर घेऊन जाण्यात यावा जेणेकरून तेथील राहणाऱ्या लोकांना या कचरा डेपो पासून होणाऱ्या समस्यांना तोंड द्यावे लागणार नाही. गेल्या अनेक वर्षापासून हा कचरा डेपो मध्ये एकाच ठिकाणी असल्याकारणाने पावसाचे पाणी आल्याने त्याच ठिकाणी ते झिरपते व त्यामुळे आजूबाजूच्या विहिरींना बोरवेल यामध्ये ते दूषित पाणी येते त्यामुळे आजूबाजूला असलेला शेतीचा परिसर हा सुद्धा नापीक झालेला आहे त्यामुळे शेतकऱ्यांना खूप याचा त्रास भोगाव लागतो हा शहरापासून जवळ असल्याकारणाने तेथील जमिनींना सुद्धा भाव मिळत नाही अशी परिस्थिती या लोकांची निर्माण झाली आहे त्यामुळे प्रशासनाने लवकरात लवकर यावर निर्णय घेऊन तो कचरा डेपो शहराच्या बाहेर घेऊन जावा ही विनंती
२) धुळे शहरात मोकाट जनावरे व पिसाळलेल्या कुत्र्यांचा बंदोबस्त प्रशासनाने लवकरात लवकर करावा त्यामुळे धुळे शहराच्या रहदारीस नागरिकांना खूप मोठा त्रास भोगाव लागत आहे. पिसाळलेले कुत्रे हॆ विद्यार्थी व ज्येष्ठ नागरिकांच्या अंगावर धावून जातात व त्यांना चावा घेतात त्यामुळे नागरिकांचा जीव धोक्यात आहे. या पिसाळलेला कुत्र्यांचा बंदोबस्त लवकरात लवकर करण्यात यावा अशी मागणी धुळे महानगरपालिका आयुक्त श्रीमती अमिता दगडे पाटील यांना धुळे युवासेना महानगरप्रमुख मनोज जाधव यांच्या वतीने निवेदन देण्यात आले.


याप्रसंगी युवासेना जिल्हा प्रमुख हरिष माळी, विस्तारक तथा उपजिल्हा प्रमुख कुणाल काणकाटे, महानगरप्रमुख मनोज जाधव, महानगर प्रमुख सिद्धार्थ करंकाळ, तालुका प्रमुख गणेश चौधरी, शहर समन्वयक जयेश सोनवणे, विभाग अधिकारी जयेश फुलपगारे, तरबेज शेख, शुभम फुलपगारे, सुमित चौधरी, तुषार सातपुते आदी युवासैनिक उपस्थित होते.

✍️ पोलीस वार्तासाठी :-                                                                      विनायक हरळ, धुळे जिल्हा पोलिस वार्ता न्यूज चॅनल 
SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.