आपला जिल्हाआरोग्य व शिक्षणमहाराष्ट्र

मुलांच्या कलागुणांना योग्य व्यासपीठ मिळणे गरजेचे

अॅड. नितीन ठाकरे

मुलांच्या कलागुणांना योग्य व्यासपीठ मिळणे गरजेचे – अॅड. नितीन ठाकरे

नाशिक पोलीस वार्ता :- मराठी राजभाषा दिनाचे औचित्य साधून जीवन केशरी मराठी युट्यूब चॅनेलचे प्रमुख प्रसाद भालेकर ह्यांच्या वतीने नाशिक शहरात घेण्यात आलेल्या वक्तृत्व व निबंध स्पर्धेचे निकाल जाहीर झाले आहेत. नाशिक शहरातील इयत्ता पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. ह्या स्पर्धेस संपूर्ण शहरातून उदंड प्रतिसाद लाभला. वक्तृत्व व निबंध स्पर्धेत सुमारे २०० विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला होता.

वक्तृत्व स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे
१) तेजल नंदकुमार निकम – प्रथम क्रमांक
वाघ गुरूजी बाल शिक्षण मंदिर, नाशिक
२) ओमकार सुरज देवरे – द्वितीय क्रमांक
पेठे विद्यालय, नाशिक
३) कनक अजयकुमार गुप्ता – तृतीय क्रमांक
वाघ गुरूजी बाल शिक्षण मंदिर, नाशिक
४) उत्तेजनार्थ क्रमांक:- श्रेया दिवाकर इंगळे
जनता विद्यालय गोरेराम लेन, नाशिक

निबंध स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे
१) रोहिणी प्रविण गांगुर्डे – प्रथम क्रमांक
जनता विद्यालय, पवननगर, सिडको
२) संकेत सुनील नागरे – पुरषोत्तम इंग्लिश स्कूल, नाशिक
३) प्रतिक्षा गोरखनाथ बागुल – जनता विद्यालय, पवननगर, नाशिक
४) गौरी संतोष नारखेडे – उत्तेजनार्थ क्रमांक
होरायझन इंग्लिश स्कूल, नाशिक

स्पर्धेच्या आयोजनाचा मुलभूत हेतू विद्यार्थ्यांच्या विचारांना योग्य व्यासपीठ मिळावे हाच होता. स्पर्धा  ऑनलाईन पद्धतीने पार पडली‌. विजेत्यांचे सन्मानपत्र व बक्षीस त्यांच्या शाळेत पोहचविण्यात येणार आहे. सन्मानपत्राद्वारे मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे सरचिटणीस अॅड. नितीन ठाकरे, नाशिक पूर्व विधानसभाचे आमदार अॅड. राहुल ढिकले, दै.भ्रमरचे संपादक श्री. चंदुलाल शहा, मराठा समाज ‘सय’ संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री. विजय खैरे ह्या मान्यवरांनी विजेत्यांचे अभिनंदन केले व पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या. स्पर्धेच्या आयोजनात आदित्य रिकामे, ओम क्षिरसागर, ओमकार कुटे यांचे मोलाचे सहकार्य मिळाले.

प्रतिक्रिया

“ मुलांच्या विचारांना व त्यांच्या कलागुणांना योग्य व्यासपीठ मिळावे यासाठी आम्ही नेहमीच प्रयत्नशील असतो. आणि त्याच हेतूने आम्ही मराठी राजभाषा दिनानिमित्त वक्तृत्व व निबंध स्पर्धेचे आयोजन केले होते. आणि ह्यात आम्हाला नाशिक शहरातील तमाम शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक, विद्यार्थी व पालक ह्यांनी दिलेल्या प्रतिसादाबद्दल मनःपूर्वक आभार.

प्रसाद भालेकर, आयोजक

२) “ विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळणे व योग्य व्यासपीठ मिळणे हे गरजेचे आहे. ”


:- अॅड. नितीन ठाकरे, सरचिटणीस, मविप्र नाशिक

✍️पोलीस वार्ता संपादक/ व्यवस्थापक :-                                   उमेश फिरके, नाशिक.                                          📲मो.नं.9637519059

✍️पोलीस वार्ता कार्यकारी संपादक :-                           रत्नदीप जाधव, नाशिक.                                        📲मो.नं.9326803590

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.