
वरणगांव – येथील ऑडनन्स फॅक्टरीमध्ये कार्यरत असलेले सिनियर डीजीएम यांच्यावर ज्युनियर डीजीएम यांनी मारहाण केल्याने जखमी झाले आहे.
वरणगांव ऑडनन्स फॅक्टरीमध्ये नेहमी काही करणोत्सव छोटे छोटे वाद सुरू असतात.मात्र या वादाकडे महाप्रबंधक दुर्लक्ष करीत असल्याने दिवसेन दिवस त्यांची हिम्मत वाढत आहे.जर आधीच महाप्रबंधकांनी लक्ष दिले असते तर आज सिनियर डीजीएम एस.आर. पाटील यांना ज्युनियर डीजीएम अमृत पाल यांनी पेपर वेट मारून फेकले नसते.आज या घटनेमुळे सिनियर डीजीएम एस.आर.पाटील यांच्या डोक्याला पेपर वेट लागल्याने दहा टाके पडल्याची प्राथमिक माहिती सूत्रांकडून मिळाली. सिनियर डीजीएम एस.आर.पाटील यांना ऑडनन्स फॅक्टरी दवाखान्यात प्राथमिक उपचारासाठी नेण्यात आले.डॉ.समीर यांनी उपचार करून सिव्हिल हॉस्पिटलमध्ये पुढील उपचारासाठी रवाना करण्यात आले.

प्राथमिक उपचार सुरू असतांना दवाखान्यामध्ये कर्मचाऱ्यांची गर्दी होती.ही माहिती सामाजिक कार्यकर्ते संजय खन्ना यांनी मिळताच त्यांनी तत्काळ दवाखान्यात पोहचून सिनियर डीजीएम एस.आर.पाटील यांची भेट घेतली.लवकरच संजय खन्ना ऑडनन्स फॅक्टरीचे महाप्रबंधक यांना ज्युनियर डीजीएम अमृत पाल यांना निलंबित करण्याचे पत्र देणार असल्याची माहिती पोलीस वार्ताला दिली.