आरोग्य व शिक्षणताज्या घडामोडीमहाराष्ट्र

कामगार शिक्षण मंडळाचा एक दिवसीय प्रायोजित कार्यक्रम (SSTTP) उत्साहात संपन्न.

भीमनगर, जेलरोड, नाशिकरोड येथे, कामगार शिक्षण मंडळाचा एक दिवसीय प्रायोजित कार्यक्रम (SSTTP) उत्साहात संपन्न.

जेलरोड, नाशिकरोड पोलीस वार्ता :-  दत्तोपंत ठेंगडी राष्ट्रीय श्रमिक शिक्षा व विकास बोर्ड, प्रादेशिक संचालनालय नाशिक आणी स्मितहर्ष एज्युकेशन अकॅडमी – नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने सोमवार दिनांक :- ४ मार्च २०२४ रोजी, भीमनगर येथील समाज मंदिर बुद्ध विहार जेलरोड, नाशिकरोड, येथे एक दिवसीय प्रायोजित अल्प मुदतीचे कार्यक्रम

(SSTTP) PS बॅनर्जी रिजनल डायरेक्टर भारत सरकार श्रम व रोजगार मंत्रालय प्राध्यापक राजेश बेदमुथा, स्मित हर्ष एज्युकेशन अकॅडमी नाशिक

सुचित्रा गांगुर्डे भारत सरकार श्रम व रोजगार मंत्रालय रिजनल ॲडव्हायझर कमिटी मेंबर भावना गायकवाड,
योजना साळवे, यांच्या अनमोल मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आला. कार्यक्रमाचे उद्घाटन महेंद्रसिंग बॅनर्जी,यांनी महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून, आणि दीपप्रज्वलनाने केले. उदघाटन प्रसंगी दत्तोपंत ठेंगडी राष्ट्रीय श्रमिक शिक्षा व विकास बोर्ड, नाशिक विभागाचे प्रादेशिक संचालक महेंद्रसिगं बॅनर्जी यांनी दत्तोपंत ठेंगडी राष्ट्रीय श्रमिक शिक्षण व विकास मंडळाच्या विविध कार्यक्रम व कार्याविषयी माहिती देऊन, ई-श्रम कार्ड, विविध सरकारी कल्याणकारी, सामाजिक सुरक्षा व पेन्शन योजनेविषयी (PMSYM), आयुष्यमान भारत यावर सविस्तर मार्गदर्शन केले. सदर कार्यक्रमात भारतीय संविधान, विविध कलमे तसेच कायद्या विषयी सुचित्रा गांगुर्डे यांनी माहिती दिली.
सध्याचा युगातील डिजिटल व आर्थिक साक्षरतेचे महत्व, उपयोगिता, तसेच ऑनलाईन फ्रॉड होऊ नये म्हणुन कोणती काळजी घ्यावी यावर विस्तृत मार्गदर्शन प्रा. राजेश बेदमुथा यांनी केले, तसेच त्याविषयी आजपर्यंत झालेल्या ऑनलाईन फ्रॉड झालेल्या काही घटना सांगीतल्या यामुळे प्रशिक्षणार्थींना पुढे आपण काय काळजी घ्यावी हे सविस्तर समजले.


कार्यक्रमाच्या समारोप प्रसंगी भावना गायकवाड यांनी विविध व्यवसायाची माहिती सांगतानाच घरगुती काय व्यवसाय करता येतील याची सविस्तर माहिती दिली. या विशेष कार्यक्रमात सहभागाबद्दल त्यांनी सर्वांचे कौतूक करुन अशा प्रशिक्षणाची आज सर्वांना गरज असल्याचे त्यांनी सांगितले.
भारतामध्ये मुलींनी सुध्दा सर्व क्षेत्रामध्ये सहभाग नोंदवण्याचे आवाहन केले. आणी लोक काय म्हणतील ? याचा कधीही विचार करु नये, मी काय करावे किंवा करु नये ? मी काय कपडे परिधान करावे? किंवा करु नये ? याचा विचार न करता आपल्याला आवडणा-या प्रत्येक गोष्टी कराव्यात. त्यामध्ये यश मिळते. याचे महत्त्व राजेश बेदमुथा यांनी पटवून दिले. या प्रसंगी सर्वाना ई-श्रम -कार्ड काढण्याचे तसेच प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजनेचा लाभ घेण्याचे आव्हान केले गेले.

याप्रसंगी जानवी विजय जाधव, निशा निलेश जाधव,सरिता सदाशिव मंडलिक, मीनाक्षी कोराटे,राजश्री मुकुंद बाहेरवाडे, भाग्यश्री मनोज चंदेले, पायल संजय साळवे, अपर्णा रत्नदीप जाधव, चंचल रत्नदीप जाधव, तेजश्री रत्नदीप जाधव,वर्षा प्रमोद बर्वे, प्रणाली किरण जाधव,कोमल संजय गायकवाड, स्विटी करण भोसले, संगीता सुरेंद्र गांगुर्डे, निकिता गुरुदत्त दोंदे, संगीता विजय जाधव, जयश्री मधुकर  गुंजाळ, दीपमाळ जितेंद्र तेजाळे, सविता प्रमोद साळवे, अंजली दुशिंग,ज्योती घुसळे, साधना निकाळे, कमल डोळस, प्रणिता मांडोळे,  कविता राजेश बर्वे, प्रिया सुनिल बर्वे,मंजूषा पवार, वर्षा सुयोग अंढागळे, तेजश्री निलेश अंढागळे, रेणुका अविनाश खरे, पूनम अभिजित गाडे, प्रिया संदीप अंढागळे,पूनम किशोर गुंजाळ, कविता किरण भालेराव,कांचन विक्रम निकाळे,प्रतिक्षा सुदर्शन चंद्रमोरे, ऋतूजा अरूण पगारे, मनिषा बाळू सिरसाट, पूजा सिध्दार्थ काळे, शितल अतूल गांगुर्डे, रेखा गौतम जाधव, वनिता जगताप, मनिषा उत्तम काळे, स्वप्ना निलेश साळवे, रूपाली रत्नाकर पगारे,जयश्री महेश पर्डे, प्रियंका भूषण आहिरे, ऋतिका जाधव,संजना काळे, दिपाली बर्वे, पूजा सिध्दार्थ काळे,शितल अतूल गांगुर्डे,ज्योती घुसळे,नंदा गायकवाड, शालिनी घुसळे, शीला सोनवणे, आदी महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

कार्यक्रमाच्या आयोजनासाठी कार्यक्रम समन्वयक श्री राजेश बेदमुथा आणि सौ. सुचित्रा गांगुर्डे, महेंद्रसिगं बॅनर्जी प्रभारी प्रादेशिक संचालक नाशिक आदींनी अथक परिश्रम घेतले!
✍️पोलीस वार्तासाठी संपादक/व्यवस्थापक :-                उमेश फिरके, नाशिक.
📱मो.नं.96375 19059
✍️पोलीस वार्तासाठी कार्यकारी संपादक :-                       रत्नदीप जाधव, नाशिक
📱मो.नं.9326803590

SHARE

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.