आपला जिल्हा

अनैतिक सबंधातून महिलेचा खून ; आरोपीस अटक

सहा दिवसांची पोलीस कोठडी

मुक्ताईनगरअतुल जावरे |  तालुक्यातील महालखेडा मधील महिलेचा अनैतिक संबंधाच्या कारणावरुन डोक्यावर दगडाने ठेचुन क्रुरतेने खुन केल्याची घटना दिनांक ५ एप्रिल रोजी घडली होती या घटनेचा पोलिसांनी उकल करून संशयित आरोपीला अटक केली असून न्यायालयात हजर केले असता सहा दिवसांची पोलीस कोठडी सूनविली आहे.
सविस्तर वृत्त असे की,दिनांक ५/४/२०२४ रोजी महालखेडा तालुका मुक्ताईनगर शिवारातील डाबरनाल्या जवळ महालखेडा तालुका मुक्ताईनगर येथील महिलेचा अनैतिक संबंधाच्या कारणावरुन डोक्यावर दगडाने ठेचुन क्रुरतेने खुन केल्याची घटना घडली होती. सदरील घटनास्थळी अधिकारी व कर्मचारी तात्काळ धाव घेतली होती.त्याचप्रमाणे स्थानिक.गुन्हे.शाखा.जळगाव कडील फॉरेन्सीक टीमला ही पाचारण करण्यात आले होते.वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तात्काळ पोलीस अधिकारी व कर्मचारी यांना संशयित आरोपीताचा शोध घेणे कामी सुचना देवून रवाना केले.सदरील संशयित आरोपी संजय सुधाकर पाटील राहणार महालखेडा तालुका मुक्ताईनगर जिल्ह्या जळगांव हा मिळुन आल्याने त्यास गुन्ह्या कामी ताब्यात घेवुन अटक करण्यात आली आहे.अटक आरोपीतास मुक्ताईनगर न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने आरोपीताची सहा दिवसांची पोलीस कोठडी रिमांड मंजुर केली आहे. गुन्ह्याचा पुढील तपास वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
सदरची कारवाई पोलीस अधिक्षक जळगांव माहेश्वर रेड्डी,अपर पोलीस अधिक्षक अशोक नखाते जळगांव, उपविभागीय पोलीस अधिकारी राजकुमार शिंदे मुक्ताईनगर यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक नागेश मोहीते, सपोनी संदिप दुनगहु,पोलीस उपनिरीक्षक प्रदिप शेवाळे, पोलीस उपनिरीक्षक राहुल बोरकर, पो.उप निरी संदीप चेढे व चालक लतिफ तडवी,प्रदीप इंगळे, मोतीलाल बोरसे, संदीप वानखेडे, सागर सावे, राहुल नावकर, गोपिचंद सोनवणे,अनिल देवरे,राहुल बेहेणवाल, अभिमान पाटील,अशांनी केली आहे.
SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.