आपला जिल्हा

पिस्टोलच्या धाकावर भुसावळ -जामनेर रोडवर 12 लाखांची लूट : आरोपी पोलिसांच्या ताब्यात

भुसावळ पोलिसांसह जळगाव गुन्हे शाखेची कामगिरी

भुसावळ –  तालुक्यातील मांडवेदिगरनजीक कॅशियरकडील 12 लाखांची रोकड पिस्टलाच्या धाकावर लूटण्यात आली होती. याप्रकरणी दाखल गुन्ह्याची उकल करण्यात भुसावळातील बाजारपेठ, तालुका व जळगाव गुन्हे शाखेला यश आले आहे. या गुन्ह्यात चार आरोपींचा सहभाग आढळला असून त्यातील दोघे अल्पवयीन असल्याने त्यांना ताब्यात घेण्यात आले दोन आरोपींना अटक करण्यात आल्याची माहिती जळगावात पत्रकार परीषदेत पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी दिली. दरम्यान, अटकेतील आरोपींची गुन्हेगारी पार्श्वभूमी असल्याची माहिती सूत्रांनी दिली. सागर बबन हुसळे (फेकरी, ता. भुसावळ व अतुल दीपक खेडकर (लहुजी नगर, जामनेर) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. आरोपींच्या ताब्यातून पाच लाखांचे बोलेरो वाहन व लुटीतील दहा लाखांची रोकड जप्त करण्यात आली आहे.

पिस्टलाचा धाक दाखवत 11 लाख लूटले – तक्रारदार भीमराव लक्ष्मण तायडे (44, जामनेर) हे जामनेर येथील तेल व्यापाऱ्याकडे नशिराबाद येथे कॅशियर आहेत. दि 3 रोजी तेल विक्रीतून आलेली 11 लाख सात हजार 42 रुपयांची रोकड कापडी पिशवीत टाकून ते मदतनीसासह जामनेरकडे दुचाकीने सुनसगाव, कुन्हेपानाचेमार्गे निघाले होते. बुधवारी सायंकाळी साडेसहा वाजता महादेव माळ ते मांडवा दिगर फाट्यांचे दरम्यान चिंचेच्या झाडाजवळ पाठीमागून आलेल्या काळ्या रंगाच्या दुचाकीवरून त्रिकूटाने पिस्टलाचा धाक दाखवत रोकड असलेली पिशवी लांबवली होती.

जळगव पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, भुसावळ उपविभागीय पोलीस अधिकारी कृष्णांत पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली जळगाव गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किसनराव नजन पाटील, तालुक्याचे पोलीस निरीक्षक बबन जगताप, सहा.निरीक्षक विशाल पाटील, भुसावळ बाजारपेठ पोलीस स्टेशनचे हवालदार उमाकांत पाटील, हवालदार रमण सुरळकर, कॉन्स्टेबल योगेश माळी, कॉन्स्टेबल प्रशांत परदेशी, भुसावळ तालुका पोलीस स्टेशनचे हवालदार युनूस मुसा शेख, हवालदार दीपक जाधव, हवालदार प्रेमचंद सपकाळे, नाईक कैलास बाविस्कर, नाईक नितीन चौधरी, राहुल महाजन, कॉन्स्टेबल उमेश बारी, स्थानिक गुन्हे शाखेचे सहा.निरीक्षक अमोल मोरे, एएसआय संजय हिवरकर, एएसआय विजयसिंग पाटील,हवालदार लक्ष्मण पाटील, हवालदार कमलाकर बागुल, हवालदार संदीप पाटील,हवालदार किशोर राठोड, हवालदार प्रवीण मांडोळे, नाईक रणजीत जाधव, नाईक श्रीकृष्ण देखमुख, कॉन्स्टेबल प्रमोद ठाकूर आदींच्या पथकाने केली.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.