आपला जिल्हामहाराष्ट्रराजकीय

अमोल संपतराव कांबळे यांना राष्ट्रीय किसान बहुजन पार्टीतर्फे‌ अधिकृत उमेदवारी जाहीर!

नाशिक लोकसभा पंचवार्षिक निवडणुक सन २०२४

नाशिक लोकसभा पंचवार्षिक निवडणुक सन २०२४ च्या होऊ घातलेल्या निवडणूकीसाठी अमोल संपतराव कांबळे यांना राष्ट्रीय किसान बहुजन पार्टीतर्फे‌ अधिकृत उमेदवारी जाहीर!

नाशिक पोलीस वार्ता :-
दिनाकः १०/४/२०२४ रोजी पक्षप्रमुख अरूण निटूरे व अनिल मेश्राम यांच्या आदेशानुसार नाशिक लोकसभा नाशिकच्या नाशिक लोकसभा पंचवार्षिक निवडणुक सन २०२४ च्या होऊ घातलेल्या निवडणूकीसाठी “अमोल संपतराव कांबळे” राहणार नाशिकरोड यांना “राष्ट्रीय किसान बहुजन पार्टी” या पक्षाकडून अधिकृत उमेदवार म्हणून पक्षाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष शालीग्राम बनसोडे यांनी उमेदवारी घोषित केली. याप्रसंगी मुंबईहुन आलेले पक्षाचे नेते :- भिकाभाऊ गांगुर्डे हे‌‌ उपस्थित होते. यावेळी महिलाध्यक्षा :- प्रियंका नायर, महिला प्रदेश उपाध्यक्षा :- सौ.मंदाकिनी गायकवाड, नाशिकरोड शहराध्यक्ष :- कचरू राऊत, नाशिकरोड शहराध्यक्ष :- किरण निमसे, उत्तर महाराष्ट्राध्यक्ष :- विजय थोरात उत्तर महाराष्ट्राध्यक्ष ;-अनिल चव्हाणके, राजन धिवर आदीनी राष्ट्रीय बहुजन किसान पार्टीतर्फे प्रसिद्धी पत्रक देऊन त्यांची अधिकृत उमेदवार म्हणून नियुक्ती केली.

उपस्थितांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार करून, टाळ्यांचा गजरात विजयासाठी त्यांना सहर्ष मंगलमय हार्दिक शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी राष्ट्रीय किसान बहुजन पार्टीचे महिला पुरूष पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते!

✍️ पोलीस वार्तासाठी व्यवस्थापक/संपादक :-                 उमेश फिरके, नाशिक.
📱मो.नं.9637519059
✍️ रत्नदीप जाधव, नाशिकरोड,
📱मो.नं.9326803590

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.