आपला जिल्हा

भुसावळात चोरट्याने दागिने लांबविले 

पोलीस वार्ता टीम

भुसावळ – शहरातील गायत्री शक्तिपीठ, पुरुषोत्तम नगर, चैतन्य अपार्टमेंट मधील रहिवाशी सुजाता श्रीकांत मंत्री यांच्या राहते घरातील ( ता.३) मे रोजी सकाळी दहा ते दुपारी दोन वाजेच्या दरम्यान कोणीतरी अज्ञात चोरट्यांनी घराच्या दरवाजे कडी – कोयंडा व कुलूप तोडून आत घरातील गोदरेज लोखंडी कपटाचे लॉक तोडून चांदीचे देव,समई,घंटी, पायल,प्लेट,वाटी,दिवा तसेच आठ हजार रुपये रोख व एक हजार रुपये किंमतीचे सोन्याचे टॉप्स असे एकूण चोवीस हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल चोरून नेला म्हणून बाजारपेठ पोलीस स्टेशन ला फिर्यादी सुजाता श्रीकांत मंत्री यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुरुन १७४/२०२४ भादवी कलम ४५४,३८० प्रमाणे  गुन्हा दाखल करण्यात आला आहे.गुन्ह्याचा तपास पोहेकॉ विजय नेरकर करीत आहे.
SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.