आपला जिल्हा

अमृत योजनेच्या पाण्याच्या टाकीवरून पडल्याने मजुरांचा मृत्यू !

पोलीस वार्ता टीम

भुसावळ /शहरातील गडकरी नगर भागात अमृत योजनेच्या माध्यमातून नवीन पाण्याच्या टाकीचे बांधकाम सुरू आहेत.या ठिकाणी काम करणारा  वसंत मोरे या  मजुरांचा सकाळी १०:३० वाजेच्या सुमारास पाण्याच्या टाकीवर काम करीत असतांना अचानक जमिनीवर पडल्याने डोक्याला व तोंडाला मार लागल्याने जागीच मृत्यू झाल्याची ही दुसरी घटना (ता.११) मे रोजी घडली.

सविस्तर वृत्त असे की,अमृत योजना ही भुसावळकारांना डोकेदुखी झाली आहे.यामुळे कित्येक अपघात झाले आहेत. तसेच अनेक वाहने या योजनेच्या खोदकाम केलेल्या खड्ड्यामध्ये फसलेले आहेत.अशा या संथ गतीने सुरू असलेल्या भुसावळ शहरातील गडकरी नगर भागात अमृत योजनेच्या माध्यमातून पाण्याची टाकी बांधकाम सुरू आहे.

यावल तालुक्यातील कासवा गावातील वसंत चावदस मोरे (वय. ५० ) ह्या मजुरांचा सकाळी काम करीत असतांना पाण्याच्या  टाकीवरून पडून जागीच मृत्यू  झाल्याची घटना घडली.काम करणाऱ्या मंजुराला सेफ्टी साहित्य देण्यात आलेली नव्हते.यामुळे मजूर पाण्याच्या टाकीवरून पडल्याने त्यांच्या डोक्याला व तोंडावर मार लागल्याने जागीच मृत्यू झाला होता. शंकेचे निर्सन काढण्यासाठी परिसरातील रहिवाशी यांनी तात्काळ मजुरास रिक्षा मध्ये टाकून डॉ.उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय हलविण्यात आले मात्र डॉक्टरांनी मयत घोषित केल्याने यामुळे परिवारावर शोककळा पसरली आहे.यांच्या पश्चात पत्नी,२ मुली विवाहित व १ मुलगा असा परिवार आहे.

भुसावळ शहरात अमृत योजनेच्या ५ पाण्याच्या टाक्यांचे काम सुरू आहे.त्यातील गडकरी नगर मधील टाकी क्रमांक १० चे काम करणारा मजूर वसंत चावदस मोरे या मजुरांचा पाण्याच्या  टाकीवरून पडल्याने मृत्यू झाला आहे.जैन एरिकेशनच्या माध्यमातून औरंगाबाद येथील ठेकेदार नितीन पटेल यास भुसावळ शहरातील अमृत योजनेच्या नवीन ५ पाण्याच्या टाक्या तयार करण्याचे काम दिले आहे. याआधी दिनांक १५ डिसेंबर २०२१ रोजी सकाळी १०.३० वाजेला दरम्यान विकास बळीराम पाटील राहणार कुऱ्हा पानाचे या गावातील मजूर काम करीत असताना पडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली होती. ( ता.११) मे २०२४ रोजी सकाळी १०.३० वाजेला अमृत च्या  पाण्याच्या टाकीचे काम करणारा मजूर वसंत चावदस मोरे यांचा अमृत योजनेच्या पाण्याच्या टाकीवरून खाली पडून मृत्यू झाल्याने परिवारातील प्रमुख काळाने हिरावून घेतल्याने परिवारासमोर मोठे संकट उभे राहिले आहे. अशा या ठेकेदारावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून काळ्या यादीत टाकावे जेणे करून आपल्या फायद्यासाठी मजुरांची जीवाशी खेळ खेळणार नाही.

◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆

अमृत योजनेच्या नवीन ५ पाण्याच्या टाक्या तयार करण्याचे काम गेले चार वर्षांपासून सुरू असतांना दिनांक १५/१२/२०२१ रोजी सकाळी १०.३० वाजेच्या सुमारास विकास बळीराम पाटील राहणार कुऱ्हा पानाचे या गावातील मजूर काम करीत असतांना याच टाकीवरून पडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली होती. ठेकेदारांच्या हलगर्जीपणामुळे पुन्हा दिनांक ११/५/२०२४ रोजी वसंत चावदस मोरे या मजुरांचा मृत्यू झाला.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.