आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्र

अखेर चांडक टाँवर वर प्रशनाचा हथोडा पडलाच !

2 डिसेंबर रोजी पिल्लरला स्ट्रक्चरल ऑडिट अहवालानंतर फफ नोटीस जारी.

अमरावती पोलीस वार्ता :-  हमालपुरा रोडवरील चांडक टॉवरची चार मजली इमारत पाडण्याचे काम अखेर सुरु झाले.

2 डिसेंबर 2023 मध्ये चांडक टॉवरच्या इमारतीतील पिल्लरला तडे गेले होते. त्यामुळे शहरात प्रचंड खळबळ उडाली होती. आता स्ट्रक्चरल ऑडिट अहवाल मिळाल्यानंतर महापालिका प्रशासनाकडून नोटीस जारी करण्यात आली. त्यानंतर चांडक टॉवर नामक इमारत पाडण्याचे काम युध्दस्तरावर सुरु करण्यात आले. डिसेंबर महिन्याच्या सुरुवातीला चांडक टॉवरच्या इमारतीतील एका पिल्लरला तडा गेला होता. त्यामुळे इमारती मधील रहिवाशांना घर खाली करावे लागले, तर तेथील कार्यालये सुध्दा बंद झाली. अचानक झालेल्या या घटनेमुळे आठ वर्षांपूर्वी तयार झालेल्या इमारत बांधकामांवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. महापालिकेकडून या इमारतीचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्यास मालकाला सांगण्यात आले होते. दरम्यान या इमारतीतील प्रवेशास प्रतिबंध लावण्यात आला होता. परंतू आता चांडक टॉवरची ही धोकादायक इमारत पाडण्याचे काम नुकतेच सुरु झाले असून, सद्यस्थितीत खिडकी, ग्रील, दारे काढून बांधकाम पाडण्याचे काम सुरु आहे.

मनपाच्या नोटीसवर कारवाई महानगरपालिके कडून नोटीस जारी करण्यात आली होती. त्यामध्ये ही इमारत धोकादायक असल्याने पाडण्यात यावी, असे आदेशीत केले होते. त्यानुसार मालकाने इमारत पाडण्याचे काम सुरु केले आहे.
प्रमोद इंगळे, अभियंता, मनपा. सुरक्षेच्या हिताचा निर्णय महापालिके च्या निर्देशानुसार स्वता:हून इमारत पाडण्याचे काम सुरु करण्यात आले आहे. धोकादायक ठरलेल्या या इमारतीमुळे कुणाचे नुकसान होऊ नये, यासाठी हा निर्णय घेण्यात आला.

✍️ पोलीस वार्ता न्युज प्रतिनिधी :-                                  अशोक वास्ताणी, अचलपूर, अमरावती.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.