आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्र

महाराष्ट्र सांस्कृतिक कला अभियानची राज्यस्तरीय बैठक संपन्न.

लोककलावंतांवरील अन्याय सहन केला जाणार नाही.

महाराष्ट्र सांस्कृतिक कला अभियानची राज्यस्तरीय बैठक संपन्न. लोककलावंतांवरील अन्याय सहन केला जाणार नाही :- सरचिटणीस अशोक भालेराव!

नाशिक पोलीस वार्ता :-   महाराष्ट्र सांस्कृतिक कला अभियान ह्या राज्यस्तरिय सांस्कृतिक संस्थेची महत्त्वाची बैठक, रविवारी शाहीर सुरेशचंद्र आहेर यांच्या अध्यक्षतेखाली हुतात्मा स्मारक, नाशिक येथे संपन्न झाली.

सदर बैठकीत मान्यवर वृध्द कलावंतांना रू.५०००/-मासिक मानधन शासनाने घोषित केल्याबद्दल. अभिनंदनाचा ठराव पारित करण्यात आला. त्याचप्रमाणे सर्वांना एकसमान मानधन दिल्यानंतर काही लोकांनी विरोध केला होता त्यांचा ह्या बैठकीत जाहिर निषेध करण्यात आला. जिल्हास्तरीय लोककला स्पर्धांचे आयोजन विषयी चर्चा करण्यात आली. सभासद नोंदणी वाढविणे, बोगस कलावंत प्रस्तावाला विरोध करणे. यावेळी विविध जिल्हा समितींचा कार्य अहवाल मांडण्यात आला.
कलावंतांच्या नवीन मागण्यांवर अनेक लोककलावंतांनी चर्चा करून विचार मांडले.

लोक कलावंतांवरील अन्याय सहन केला जाणार नाही. असे सरचिटणीस अशोक भालेराव यांनी निक्षून सांगितले. जालना, अहमदनगर, बीड व नाशिक जिल्हा शाखा विस्तार, तसेच राज्य स्तरीय कलावंत मेळाव्याचे जालना येथे आयोजन करणे इ. विषयां वर चर्चा करण्यात आली.
बैठकीचे प्रस्ताविक राज्य सरचिटणीस अशोक भालेराव यांनी केले. स्वागत संस्थेचे नाशिक जिल्हा अध्यक्ष संपत खैरे यांनी केले. सूत्रसंचालन मनोहर नेटावटे यांनी केले.यावेळी संस्थेचे राज्य उपाध्यक्ष रामभाऊ घोडके व अध्यक्ष शा.सुरेशचंद्र आहेर
यांनी उपस्थित लोककलावंतांना मार्गदर्शन केले. तसेच श्री घोडके यांचा वाढदिवसही केक कापून साजरा करण्यात आला.
याप्रसंगी श्रीकांत गायकवाड, शाहीर रघुनाथ सोनवणे, शा. पंडित रिकामे, रेखा महाजन, राजेंद्र वावधने ज्ञानेश्वर जगताप, संजय गोसावी, पांडुरंग सांगळे, कारभारी पुरकर, श्रावण वाघमोडे, मुरलीधर पालवे, आदि. सह जिल्ह्यातील व तालुक्यातील अनेक लोककलावंत उपस्थित होते. शेवटी राज्यकोषाध्यक्ष अनिल मनोहर यांनी आभार मानले.

‌ ✍️ पोलीस वार्तासाठी व्यवस्थापक/संपादक :-                उमेश फिरके, नाशिक.
📱मो.नं.9637519059
पोलीस वार्तासाठी कार्यकारी संपादक :-                     रत्नदीप जाधव, नाशिकरोड,
📱मो.नं.9326803590

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.