आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीय

नाशिक लोकसभा मतदारसंघातील उमेदवारांची खर्चाची दुसरी तपासणी यशस्वीरित्या पार पडली.

नाशिक लोकसभा मतदारसंघातील उमेदवारांची खर्चाची दुसरी तपासणी यशस्वीरित्या पार पडली.

नाशिक पोलीस वार्ता :-    नाशिक लोकसभा मतदारसंघातील सर्व उमेदवारांच्या निवडणूक खर्चाची प्रथम तपासणी खर्च निरीक्षक मा. श्री प्रवीण चंद्रा (IRS) व मा. श्री सागर श्रीवास्तव (IRS) यांच्या उपस्थितीत दि.14 में 2024 रोजी शासकीय विश्रामगृह ‘शिवनेरी’ सभागृह, नाशिक येथे यशस्वीरित्या पार पडली. सदर तपासणीत ३१ उमेदवारांपैकी 29 उमेदवार/प्रतिनिधी उपस्थित होते. श्री. कैलास मारुती चव्हाण (आम जनता पार्टी इंडिया) व श्रीमती भाग्यश्री नितिन अडसुळ (इंडियन पीपल्स अधिकार पार्टी) ह्या सदर बैठकीत अनुपस्थित असल्यामुळे त्यांना मा. भारत निवडणूक आयोग यांच्या सूचनेनुसार मा. जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी यांच्याद्वारे नोटीस देण्यात आलेली आहे.

सदर बैठकीत खर्च निरीक्षक मा. श्री प्रवीण चंद्रा व मा. श्री सागर श्रीवास्तव यांनी सर्व उमेदवारांच्या खर्चाच्या नोंदवह्याची तपासणी केली. सदर तपासणीत शिवसेना पक्षाचे उमेदवार श्री हेमंत तुकाराम गोडसे यांना दिनांक 08.05.2024 व दिनांक 12.05.2024 रोजी मा. मुख्यमंत्री यांनी नाशिक शहरात प्रचारासाठी घेतलेल्या बैठकीचे खर्चाचे तपशील उमेदवाराच्या हिशोब नोंदवहीत आलेला नाही. तसेच प्रबुद्ध रिपब्लिकन पार्टीच्या उमेदवार श्रीम, दर्शना अमोल मेढे व बहुजन समाज पार्टीचे उमेदवार श्री. अरुण मधुकर काळे यांचे खचांचा तपशील तपासताना काही त्रुटी आढळून आल्या आहेत. या अनुषंगाने मा. जिल्हाधिकारी, नाशिक यांचे स्तरावरून उमेदवारांना याबाबत नोटीसी द्वारे खुलासा मागवून याबाबत उमेदवाराच्या अभिप्रायाच्या अनुषंगाने पुढील कार्यवाही करण्याच्या सूचना मा. खर्च निरीक्षक यांनी दिलेल्या आहेत. तसेच, अपक्ष उमेदवार स्वामी सिद्धेश्वरानंद सरस्वती यांचे खर्च हिशेब नोंदवहीत तफावत आढळून आली. जास्तीचा खर्च स्वामी सिद्धेश्वरानंद सरस्वती यांनी मान्य केला आहे.

दुसऱ्या तपासणीनंतर उमेदवारांच्या खर्चाचे दैनंदिन नोंदवही मा. निवडणूक आयोग यांच्या संकेतस्थळावर अपलोड करण्यात येणार आहे. तिसरी खर्च तपासणी दिनांक १८ मे, २०२४ रोजी शासकीय विश्रामगृह ‘शिवनेरी’ नाशिक येथे पार पडणार आहे. या तपासणीसाठी सर्व उमेदवारांनी त्यांच्या खर्च नोंदवही व इतर अनुषंगिक कागदपत्रे यासह उपस्थित राहावे, असे आवाहन खर्च निरीक्षक खर्च निरीक्षक मा. श्री प्रवीण चंद्रा सर व मा. श्री सागर श्रीवास्तव सर यांनी केले आहे. दुसरी तपासणी साठी डॉ. भालचंद्र चव्हाण जिल्हा नोडल अधिकारी खर्च नियंत्रण पथक, श्री विजयकुमार कोळी संपर्क अधिकारी, श्री. सुरेश महंत संपर्क अधिकारी, श्री दत्तात्रेय पाथरूट सहा. जिल्हा नोडल अधिकारी, श्री एन व्की कळसकर फिल्ड नोडल अधिकारी, श्री. प्रकाश बानकर खर्च नियंत्रण पथक, लेखांकन चमूचे नियंत्रक श्री. चैतन्य परदेशी, श्री अनिल कोमजवार सहाय्यक खर्च निरीक्षक मुख्यालय तसेच लेखांकन चमूचे प्रमुख श्री सुभाष घुगे, श्री विनोद खैरनार, श्री किशोर पवार, श्री सुनील कोतवाल, श्री प्रशांत घोलप व सर्व सहाय्यक खर्च निरीक्षक व खर्च चमूतील इतर कर्मचारी उपस्थित होते.

✍️ पोलीस वार्ता न्युजसाठी :-                                            राज निकाळे, नाशिक.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.