आपला जिल्हाक्राईमताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीय

माळवाडी मधील शेतकऱ्यांना नजर कैदेत अटक!

मोदीच्या सभेसाठी हुकूमशाही...

माळवाडी मधील शेतकऱ्यांना नजर कैदेत अटक मोदीच्या सभेसाठी हुकूमशाही

देवळा पोलीस वार्ता :-    माळवाडी येथील कांदा उत्पादक शेतकरी नरेंद्र मोदी यांची पिंपळगाव ( ब ) येथे होत असलेल्या सभेसाठी कांदा उत्पादक शेतकरी आपल्या व्यथा मांडून मोदीपुढे आपले म्हणणे मांडणार होते. पण सभेला कांदा उत्पादकांनी आपली व्यथा मांडून मोदी सरकारची शेतकऱ्यांप्रती घेतलेल्या फसव्या निर्णयांची पोल खोल होऊन मोदी सरकारचे अपयश उघड होऊ शकते. या भीती पोटी प्रशासनावर दबाव टाकून कांदा उत्पादकांना सभेच्या वेळेत तोंड उघडू नये म्हणून देवळा पोलीस स्टेशन येथे नजर कैदेत शेतकऱ्यांना अटक करून घेण्यात आले.

यात माळवाडी येथील कांदा उत्पादक शेतकरी तथा शिवव्याख्याते प्रा यशवंत गोसावी, शेतकरी अमोल बागुल, उपसरपंच मयूर बागुल यांना मोदींची पिंपळगाव येथील सभा धूमधडक्यात पार पाडण्यासाठी अटक केली आहे. तसेच देवळा तालुक्यातील अनेक शेतकरी नेते यांना नजर कैद आज पिंपळगाव येथे पंतप्रधान मोदींची सभा होत आहे या सभेच्या पार्श्वभूमीवर सभेमध्ये काही अनुचित प्रकार घडू नये यासाठी खबरदारी म्हणून देवळा तालुक्यातील कृष्णा जाधव, प्रहार शेतकरी संघटना जिल्हा उपाध्यक्ष तसेच मराठा विद्या प्रसारक संचालक विजय पगार, आदिसह काही लोकांना नजर कैद करण्यात आलेले आहे.

या अशा लोकांना नजर कैद केल्यामुळे मतदानावर याचा कितपत चांगला किंवा वाईट परिणाम होईल हे आता मतदानाद्वारे नागरिक व्यक्त करतील असे दिसत आहे.

✍️ पोलीस वार्ता न्युज देवळा तालुका प्रतिनिधी:-  आदिनाथ ठाकूर दहिवड

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.