आपला जिल्हा

धामणगाव येथे राष्ट्रीय डेंग्यू दिवस साजरा

पोलीस वार्ता टीम

धामणगांव ता. जळगाव :- प्रा. आ. केंद्र धामणगांव येथे आज राष्ट्रीय डेंग्यू दिवस साजरा करण्यात येवून जनजागृती करण्यात आली.

जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सचिन भायेकर , जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. तुषार देशमुख व ता. आरोग्य अधिकारी डॉ. प्रमोद पांढरे याचे मार्गदर्शनाखाली प्रा. आ. केंद्र धामणगांव येथे राष्ट्रीय डेंग्यू दिना निमित्त उपस्थित नागरिकांना वैद्यकीय अधिकारी डॉ. अजय सपकाळ व डॉ अभिषेक ठाकूर यांनी सविस्तर माहिती देऊन जनजागृती करण्यात आली.

दरवर्षी १६ मे रोजी राष्ट्रीय डेंग्यू दिवस साजरा करण्यात येत असतो. डेंगू दिवस साजरा करण्याचा मुख्य उद्देश म्हणजे नागरिकांना डेंगू आजारा बाबत शास्त्रीय माहिती मिळून जनजागृती निर्माण व्हावी यासाठी शासन स्तरावरून विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत असते.

डेंग्यू व कीटकजन्य आजारांचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून प्रतिबंधात्मक उपाय योजना, व घ्यावयाची काळजी या बाबत माहिती दिली. डेंग्यू व किटकजन्य आजारांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाबरोबर जनतेचा सहभाग असणे देखील गरजेचे आहे. त्याशिवाय या आजारांवर आपण नियंत्रण मिळू शकत नाही. असेही यावेळी डॉ. अभिषेक ठाकूर म्हणाले.

प्रा आ केंद्र धामणगांव अंतर्गत उपकेंद्र ममुराबाद, मोहाडी, व सावखेडा बु. येथे ता. हिवताप पर्यवेक्षक श्री चंद्रशेखर महाजन , आरोग्य सहाय्यक राजेंद्र बारी, आरोग्य सेवक निलेश पाटील, घनश्याम लोखंडे, अमित आहेर व सतीश अजलसोडे यांनी गावात जाऊन पाण्याचे कंटेनर, डास उत्पत्ती स्थाने, याची पाहणी केली.

डेंग्यू व किटकजन्य आजारांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी व डासांच्या अळ्या नष्ट करण्यासाठी प्रत्येक आठवड्याला कोरडा दिवस पाळावा, दैनंदिन पाण्याच्या वापराकरिता घरामधील व घराबाहेरील टाकी आठवड्यातून एक वेळेस पूर्णपणे रिकामी व घासून-पुसून स्वच्छ करून पुन्हा भरून झाकून ठेवावी, इमारतीच्या गच्चीवर व परिसरात टायर, नारळाच्या करवंट्या व इतर पाणी सासेल अशा टाकाऊ वस्तू ठेवू नयेत. त्यांची विल्हेवाट लावावी. गावालगतच्या नाल्या मधील पाण्यात गप्पी मासे सोडावे इ. बाबत जनजागृती करण्यात आली.

यावेळी डॉ. राहुल बनसोडे, डॉ. वृषाली पवार, डॉ. मुस्कान तिवारी डॉ. गायत्री सपकाळ, ता. हिवताप पर्यवेक्षक चंद्रशेखर महाजन, आरोग्य सहाय्यक राजेंद्र बारी, औ.नि.अ. प्रियंका मंडावरे, नेत्र चि.अ. वृंदा कुंभारे, महेश वाणी, आरोग्य सेवक निलेश पाटील, घनश्याम लोखंडे, सतीश अजलसोडे , अमित अहिरे , संगीता कोळी, एन बी पठाण , सुनिता पाटील, जयश्री कंखरे, शिवाणी वाजपेयी, सुवर्णा नाव्ही, आशिष अवस्थी, दीपक कोळी, मयूर पाटील, सुनील कोळी, संगीता घेर व आशा सेविका आदी उपस्थित होते.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.