महाराष्ट्र

रेल्वे ईसीसी बँक निवडणूक मतमोजणी सुरू ; रात्री उशिरा पर्यत निकाल जाहीर होणार !

पोलीस वार्ता टीम

भुसावळ – रेल्वे ईसीसी बँक निवडणूक बुधवार रोजी भुसावळ विभागासाठी पार पडली.या निवणुकीमध्ये १२१ उमेदवार रिंगणात उतरले आहे.(ता.२७) जून रोजी सकाळी आठ वाजेला डी.आर.एम. कार्यालयातील कार्मिक हॉल मध्ये मतमोजणी साठी आठ टेबल लावण्यात आले होते.सदरील प्रक्रिया ही व्यवस्थापक श्रीमती इति पांडेय यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.  मतमोजणी ठिकाणी निवडणूक निर्णय अधिकारी एन.एस.काझी हे ठाम मांडून होते. अद्यापावतो रेल्वे ईसीसी बँक निवडणूक मतमोजणी सुरू असून रात्री उशिरा पर्यत निकाल जाहीर करण्यात आले.
रेल्वे ईसीसी बँक निवडणूक मतमोजणी संदर्भात निवडणूक निर्णय अधिकारी एन.एस.काझी यांनी दिलेल्या प्राथमिक माहितीच्या आधारे भुसावळ विभागातून एकूण १२१ उमेदवार निवडणूक लढवत असून नाशिक (सी.डब्ल्यू.एम /टी.एम.डब्ल्यू )- एक जागा सेंट्रल रेल्वे मजदूर युनियन,नाशिक रोडच्या दोन जागा लढत – एक जागा नॅशनल रेल्वे मजदूर युनियन तर दुसरी जागा सेंट्रल रेल्वे मजदूर युनियन,मनमाड – नॅशनल रेल्वे मजदूर युनियन, सी.डब्ल्यू.एम (ईस्ट/वेस्ट)मनमाड- सेंट्रल रेल्वे मजदूर युनियन,नांदगाव – सेंट्रल रेल्वे मजदूर युनियन, चाळीसगांव- सेंट्रल रेल्वे मजदूर युनियन,पाचोरा – सेंट्रल रेल्वे मजदूर युनियन व रेल कर्मचारी ट्रक मेन्टेनन्स असोसिएशन यामध्ये (सारखे मते ),सी.डब्ल्यू.एम / ई.एल. डब्ल्यू ( विद्युत इंजन कारखाना, भुसावळ) दोन जागा- एक जागा सेंट्रल रेल्वे मजदूर युनियन तर दुसरी जागा नॅशनल रेल्वे मजदूर युनियन, बऱ्हाणपूर- एक जागा नॅशनल रेल्वे मजदूर युनियन,खंडवा – दोन जागा सेंट्रल रेल्वे मजदूर युनियन,बोदवड – नॅशनल रेल्वे मजदूर युनियन, शेगाव – नॅशनल रेल्वे मजदूर युनियन,अकोला –
नॅशनल रेल्वे मजदूर युनियन,मूर्तिजापूर – नॅशनल रेल्वे मजदूर युनियन,बडनेरा – दोन जागा नॅशनल रेल्वे मजदूर युनियन असे  उमेदवार विजयी झाले आहे.
रेल्वे ईसीसी बँक निवडणूकीमध्ये अद्यापावतो नॅशनल रेल्वे मजदूर युनियनचे दहा उमेदवार तर सेंट्रल रेल्वे मजदूर युनियनचे आठ उमेदवार विजयी झाल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी यांनी दिली.
SHARE

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.