महाराष्ट्र

ईसीसी बँक निवणुकीत एन.आर.एम.यु. युनियनला घवघवीत यश 

पोलीस वार्ता टीम

भुसावळ – येथील रेल्वे ईसीसी बँकेची निवडणूक २६ जून रोजी भुसावळ विभागासाठी घेण्यात आली यामध्ये १२१ उमेदवार ३५ जागेसाठी रिंगणात उतरले होते. दुसऱ्या दिवशी २७ जून रोजी डी.आर.एम. कार्यालयातील कार्मिक विभागातील हॉल मध्ये  सकाळी आठ वाजेला मतमोजणी सुरू करण्यात आली असून २८ जून पर्यत दुपारी चार वाजेच्या दरम्यान मतमोजणी पूर्ण झाली मात्र निकाल संदर्भात मध्य रेल्वे व्यवस्थापक श्रीमती इति पांडेय तसेच निवडणूक निर्णय अधिकारी एन.एस.काझी यांना विचारणा केली असता निवडणुकी संदर्भात आम्ही कुठलीही माहिती प्रसिध्दी माध्यमांना देवू शकत नाही हा अधिकार आमचा नसून भुसावळ विभागाचे निवडणूक निर्णय अधिकारी (मुंबई) यांचा आहे असे सांगून टाळण्यात आले.मात्र नॅशनल रेल्वे मजदूर युनियनचे २१ उमेदवारांनी अतिष बाजी करीत जल्लोष केला.

ईसीसी बँक निवडणुकीत ३५ उमेदवार हे भुसावळ विभागासाठी लढले असून यामध्ये २१ उमेदवार नॅशनल रेल्वे मजदूर युनियनचे निवडणूक आले असून ११ उमेदवार सेंट्रल रेल्वे मजदूर संघ चे निवडणूक आले असून पाचोरा येथील उमेदवार यांना समान मते पडल्याने या उमेव्दारांचा निकाल अद्यापावतो गुलदस्त्यात आहे.

सदरील निकाल हा रेल्वे विभागाने अधिकृत दिलेला नसून निवडून आलेले स्वयंम घोषित उमेदवार यांनी जल्लोष करते वेळी दिला. ईसीसी बँक मतमोजणी तब्बल वीस तास सुरू राहिली, मात्र रेल्वे प्रशासनाने निकाल देण्यात टाळाटाळ करण्यामागील गौडबंगाल काय आहे ही एक संशोधनाची बाब आहे.

SHARE

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.