आपला जिल्हा

भुसावळला बाल लैगिंक कायद्या सह ॲट्रॉसिटी गुन्हा दाखल 

पोलीस वार्ता टीम

भुसावळ – तालुक्यातील सेन्टपॉल इंग्लिश मिडीयम स्कुल साक्री फाटा भुसावळ येथे साडे तीन वर्षाची नर्सरी मध्ये शिकणाऱ्या बलिकेसोबत मारुती व्हॅन चालक याने शारीरिक व मानसिक त्रास देण्याचे कृत्य केल्याचा प्रकार उघडकीस आल्याने पोलीस स्टेशनला बाल लैंगिक कायद्या सह ॲट्रॉसिटी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
माहिती अशी की, (ता.१ ते २) जुलै रोजी दुपारी बारा ते साडेबारा वाजेच्या दरम्यान स्कुल बस मारुती व्हॅन क्रमांक (एम.एच.१९.अ.ई.०२७९) मध्ये ड्रायव्हर प्रसाद हिरामण चौधरी राहणार साकरी यांच्या शेजारी बसून सेन्टपॉल इंग्लिश मिडीयम स्कुल साक्री फाटा भुसावळ या शाळेच्या बाहेर (मारुती व्हॅन) मध्ये ड्रायव्हर शेजारी बसवून पीडित बलिकेला मानसिक व शारीरिक त्रास होईल असे कृत्य केले म्हणून संशयित आरोपी प्रसाद हिरामण चौधरी यांचे विरुद्ध बाजारपेठ पोलीस स्टेशनला नवीन कायद्या अंतर्गत हा पहिलाच गुन्हा गुरुन २४४/२०२४ भा.द.वि.कलम ६४,६५(२) ३,४,५,६,३(१)(w)(i),३(१)(w)(ii) प्रमाणे दिनांक ४/७/२०२४ रोजी बाल लैंगिक कायद्या सह ॲट्रॉसिटी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.सदरील गुन्ह्यातील संशयित आरोपीस अटक करण्यात आली आहे.
SHARE

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.