आपला जिल्हा

भुसावळात मतमोजणी दरम्यान रेल्वे कर्मचाऱ्यास मारहाण 

पोलीस वार्ता टीम

भुसावळ – येथील पंधरा बंगला भागातील रहिवाशी तसेच (ऑल इंडिया स्पॉइसमन युनियनचे) भुसावळ मंडळ अध्यक्ष श्यामसुंदर चुटीले या रेल्वे कर्मचाऱ्यास ईसीसी बँक निवडणूक (आचार संहिता) दरम्यान भुसावळ डी.आर. एम कार्यालयाच्या आवारात हरी मोहन मीना (गार्ड) यांनी बेधम मारहाण केल्याची घटना घडली असून या बाबत रेल्वे व्यवस्थापक यांना तक्रार देण्यात आली.
सेंट्रल रेल्वे एम्प्लॉईज को.ऑफ.क्रेडिट सोसायटी भुसावळ या संस्थेची भुसावळ विभागासाठी नुकतीच निवडणूक पार पडली. दिनांक २७ जून रोजी निकाल असल्याने सकाळी आठ वाजेला भुसावल रेल्वे प्रबंधक कार्यालय (डीआरएम) येथे कार्मिक विभाग कार्यालयात मत मोजणी सुरू असतांना श्यामसुंदर चुटीले हे सेंट्रल रेल्वे मजदूर युनियनचे उमेदवार असून निवडणुकीत सेंट्रल रेल्वे मजदूर युनियनचे पॅनल चे उमेदवार विजयी झाल्याने त्यांचा उत्सव साजरा करीत असतांना नॅशनल रेल्वे मजदूर युनियन चे उमेदवार हरी मोहन मीना (गार्ड) यांनी श्यामसुंदर चुटीले यांना अश्लील शिवीगाळ करीत मारहाण करून दुखापत पोहचविली. यावेळी त्यांच्यासोबत विजयसिंह हे सुद्धा पाहतांना उभे होते.तरी संबंधीत व्यक्तीवर योग्य ती कारवाई करण्यासाठी श्यामसुंदर चुटीले यांनी मध्य रेल्वे व्यवस्थापक श्रीमती इति पांडेय यांच्याकडे तक्रार देण्यात आली असून अद्यापावतो कुठलीही कारवाई करण्यात आलेली नाही.सदरील प्रकरणास दडपण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोपी तक्रारदार श्यामसुंदर चुटीले यांनी केला आहे.
SHARE

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.