आपला जिल्हा

भुसावळला दुकानातून ८८ हजारांचा गुटखा जप्त 

(अन्न व औषध प्रशासन विभागाची कारवाई)

भुसावळ – शहरातील आठवडे बाजार भागातील ओम साई ट्रेडर्स दुकान नंबर ३० संत बाबा तुलसीदास महाराज कॉम्प्लेस ८८ हजारांचा गुटखा जप्त करण्यात आला.
या संकुलनात गुटखा विक्री होत असल्याची गोपनीय माहिती अन्न व औषध प्रशासन विभागाचे अधिकारी यांना मिळल्यावरून (ता.५) रोजी दुपारी चार ते सहा वाजेच्या दरम्यान पथक घटनास्थळी पोहचून दुकानांची तपासणी केली असता दुकानांत सिगनेचर पान मसाला २३ पाकिटे ७२४५,रंजनागंधा पान मसाला ३० पाकिटे ३१,०००,पान पराग पान मसाला २० बॉक्स ५०००, बाबा १२० सुंगधित तंबाखू १०० बॉक्स ४५०० एकूण ८८,४४५ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.सदरील गुटखा विनय सिंग प्रल्हादसिंग पाटील राहणार हुडको कॉलनी, मिरची ग्राउंड, वांजोळा रोड भुसावळ यांचे असून अन्न सुरक्षा अधिकारी शरद पवार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून बाजारपेठ पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पथक जप्त केलेला माल वाहनात ठेवत असतांना त्यादरम्यान दुकान हा पसार झाला.अन्न व औषधी प्रशासन विभागाने अधिकाऱ्यांनी दुकान सील केले.
सदरची कारवाई अन्न सुरक्षा अधिकारी शरद पवार, सहाय्यक आयुक्त वि.प.धवड,अन्न सुरक्षा अधिकारी यो.रो.देशमुख अशांनी मिळून केली.
SHARE

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.