महाराष्ट्र

विहार सरोवर परिसरातील बेकायदा हॉटेल्स वर बुलडोझर कधी चढवणार?

विद्रोही पत्रकार, पँथर डॉ. राजन माकणीकर यांचा मा. मुख्यमंत्र्यांना सवाल

मुंबई दि (प्रतिनिधी) पवई येथील ब्रिटिश कालीन विहार सरोवर शेजारी असलेल्या शासनाच्या जागेवर अनधिकृत बांधकामे झाले आहेत. त्यात प्रामुख्याने चादर पलटी हॉटेल्स निर्माण झाली आहेत, या हॉटेलवर आपण बुलडोझर कधी चढवणार असा प्रश्न विद्रोही पत्रकार डॉ. माकणीकर यांनी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांना केला आहे.

देशव्यापी संविधान जनजागृती व साक्षरता अभियानचे राष्ट्रीय आयोजक राजन माकणीकर यांनी मुख्यमंत्री एकनाथराव जी शिंदे यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की, नैसर्गिक सोदर्यने नटलेले ब्रिटिश कालीन विहार सरोवर हा एक ऐतिहासिक ठेवा तर आहेच याशिवाय निसर्गाची देणं आहे. मुंबईतील बहुतांश रहिवाश्यांची तहान भागवीन्याचे स्रोत म्हणून हे सरोवर ओळखले जाते.

सदर तलावाशेजारी धनदांडग्या व राजकारणी परप्रातियांनी येथे अतिक्रमणे केली आहेत. बृहण मुंबई महापालिकेचे संनदी अधिकारी मात्र मूग गिळून गप्प आहेत कारण त्यांना त्याचा मोबदला दिला जातो. सदरील वरिष्ठ अधिकारी कनिष्ठ अधिकाऱ्यांना आर्थिक बळ दिले जाते मदिरापान व खानपान सह शारीरिक भूक भागविली जाते असे कळते.

या ठिकाणी चादर पलटी हॉटेल्स चे जाळे पसरले असून या हॉटेलातून ड्रग्स च्या व्यापाऱ्यांना आश्रय दिला जात असल्याचे कळते, अल्पवयीन मुलींसह शारीरिक भूक शमवली जात असल्याची चर्चा आहे, असंख्य तरुण व पुरुषांना येथे अल्पवयीन मुली देहविक्रिसाठी आणले जाते असेही समजते. पोलीस प्रशासनाला भरमसाठ हप्ता दिला जातो यामुळे पोलीस कोणतीच कारवाई करत नाहीत असेही समजते. या आशयाचे पत्र पँथर डॉ. राजन माकणीकर यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिले आहे.

याच परिसरात MD ची विक्री होत असल्याचे समजते. बाजूलाच मोरारजी नगर बिट पोलीस चौकी आहे, पण तेथील पोलीस हप्ता घेवून MD विक्रीला प्रोत्साहन देत असल्याचे समजते कारण की, या पोलिसांनी या महिनाभरात एकही अरोपी न पकडता घाटकोपर पोलिसांनी या हद्दीत येवून कारवाई केली आहे.

येथील पोलिस व पालिका यंत्रणेच्या नाकावर टिच्चून माजी नगरसेवक व दक्षिण भारतीयांनी येथे बेकायदा हॉटेल्स निर्माण करून वासना व एम.डी विक्रीचा हैदोस माजवला आहे.

विकासक प्रशांत शर्मा आपल्या राजकीय व पैश्याच्या आर्थिक बळावर विहार सरोवर शेजारी अवैध्य पने खोदकाम करून शासनाला कोणतेही रॉयल्टी न भरता मातीचे ढिगारे ढंपर ने वाहून अन्यत्र टाकले जात आहेत, याही प्रकरणाची तक्रार पालिकेला केली असूनही यावे कोणतीच कारवाई केली गेली नाही.

विहार सरोवर हे राष्ट्रीय धरोहार असल्यामुळे त्याचे जतन करणे हे भारतीयांचे परम कर्तव्य आहे, तसेच परिसरात खोदकाम केल्यामुळे भू गर्भ व भू जल पातळीला धोका निर्माण होवून पर्यावरणावर परिणाम होवू शकतो. यामुळे विकासक प्रशांत शर्मा यांना खोदकाम व बांधकाम करण्यास कोणत्या सनदी अधिकाऱ्याने, कोणत्या आधारावर, कोणते दस्तऐवज पडताळणी करून परवानगी दिली हे तपासावे तसेच दिलेल्या परवानग्या रद्द कराव्यात व निसर्ग आणि पर्यावरणाचा समतोल राखावा. अशी विनंती केली आहे.

आपल्या मार्फतीने राज्यातील अवैध्य बांधकामे व बार वर हातोडा पडला आहे, त्याच धर्तीवर येथील टुरिस्ट हॉटेल व अवैध्य स्टुडिओ तसेच परिसरातील सर्वच अनधिकृत हॉटेलवर बुलडोझर चढवून ही जागा तसेच महंमद युसुफ खोत यांच्या ट्रस्ट च्या जागेवरील अतिक्रमण, अवैध्य कब्जा, बनावट पेपर वर्क तसेच खोट्या बनावट पेपरच्या अधारावर पेपर बनवणाऱ्या दलाल व गुंडांना ताब्यात घेवून कारवाई करण्यात यावी व सर्व जमीन शासनाच्या ताब्यात घेण्यात यावी. अशीही मागणी डॉ. माकणीकर यांनी केली आहे.

SHARE

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.