आपला जिल्हा

दिपनगर येथे इंजिनियर्स असोसिएशन ची तृतीय केंद्रीय कार्यकारणी बैठक संपन्न

पोलीस वार्ता टीम

भुसावळ – तालुक्यातील दिपनगर येथे इंजिनियर्स असोसिएशन ची तृतीय केंद्रीय कार्यकारणी बैठक दिनांक ६ जुलै २०२४ रोजी सकाळी १० वाजता. नवीन मनोरंजन केंद्र दिपनगर येथे आयोजित करण्यात आली होती. यावेळी कार्यक्रमाचे उद्घाटन आमदार संजय सावकारे यांच्या हस्ते करण्यात आले. प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष अभियंता केदार रेळेकर अध्यक्ष एस.ई.ए., प्रमुख पाहुणे अभियंता संजय मारुडकर संचालक (संचलन) महानिर्मिती, अभियंता अभयारण्ये संचालक (प्रकल्प) महानिर्मिती, मुख्य अभियंता मोहन आव्हाड भुसावळ औष्णिक विद्युत केंद्र, अभियंता राजाराम शितोळे उपाध्यक्ष एस ई.ए, अभियंता संतोष खुमकर सरचिटणीस एस इ ए, अभियंता नागनाथ गयाळे संघटन सचिव एस इ ए व स़घटनेचे पदाधिकरी उपस्थित होते.

प्रसंगी मान्यवरांच्या हस्ते डॉ.एम. विश्वेश्वरैया याच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून दिपप्रज्वलन करण्यात आले. कार्यक्रमास उपस्थित प्रमुख पाहुण्यांचे आयोजकांतर्फे पुष्पगुच्छ व सन्मानचिन्ह देऊन स्वागत करण्यात आले. यावेळी एस.ई.ए.च्या कार्याची चित्रफिती दाखवण्यात आली. प्रसंगी कार्यक्रमाची प्रस्तावना अभियंता विशाल आढाव या़नी केले, तर अभियंता केदार रेळेकर, अभियंता अभय हरणे, मुख्य अभियंता मोहन आव्हाड, आमदार संजय सावकारे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.

कार्यक्रम यशस्वीतेसाठी सहसचिव अभियंता विशाल आढाव , सचिव निर्मिती राज्य समन्वयक अभियंता आशुतोष लांबोळे व सर्व सन्माननीय पदाधिकारी व सभासद एस इ ए महानिर्मिती भुसावळ यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहाय्यक अभियंता शिल्पा पाटील व उपकार्यकारी अभियंता चित्रा पाटील यांनी केले.

SHARE

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.