आपला जिल्हा

अत्याचारातून अल्पवयीन मुलगी गर्भवती !

पोलीस वार्ता टीम

भुसावळ – तालुक्यातील एका गावात राहणाऱ्या 17 वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून तिला गर्भवती केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी शुक्रवार 5 जुलै रोजी रात्री 11 वाजता भुसावळ तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सविस्तर वृत्त असे की, चोपडा तालुक्यातील राहणारी तरुणीही भुसावळ तालुक्यातील जोगलखोरी शिवारात आपल्या नातेवाईकांसह वास्तव्याला आहे. ती शरीराने विकलंग व अल्पवयीन असल्याचा फायदा घेत संशयित आरोपी गोपाल भिमसिंग बारेला रा. भुसावळ याने पीडित अल्पवयीन मुलीवर 9 जून 2024 रोजी तिच्या अत्याचार केला.या अत्याचारातून अल्पवयीन मुलगी गर्भवती राहिली. हा प्रकार तिच्या नातेवाईकांच्या लक्षात आल्यानंतर भुसावळ तालुका पोलिस ठाण्यात घेऊन तक्रार देण्यात आली. त्यानुसार शुक्रवारी 5 जुलै रोजी रात्री 11 वाजता पीडित मुलीच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरून संशयित आरोपी गोपाल भिमसिंग बारेला रा. भुसावळ याच्यावर भुसावळ तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक महेश गायकवाड करीत आहे.

SHARE

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.