आपला जिल्हा

तळवेल येथे भर वस्थित हरणांचा संशयास्पद मृत्यू..

घटनास्थळी वनविभागातील अधिकारी कर्मचारी दाखल..!

भुसावळ  औल्विन स्वामी | तालुक्यातील तळवेल गावामध्ये सकाळच्या सुमारास नर जातींचे साधारण 8 ते 10 वर्ष वयाचं हरण हा वन्य प्राणी मृत्युमुखी सापडल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.मृत्यूमुखी पडलेला हरण हे रहदारी भागात सापडल्याने या भागातील जनतेत अनेक चर्चेला उधाण आल्याचे चित्र दिसून येत आहे.
रोड लागत नर प्रजातीतील हरण हे रहदारी भागात आलाच कसा? का याला कोणी आणले की काय ? कोणी शिकार तर केली नाही ना? असे  अनेक प्रश्न सामान्य जनतेच्या मनात निर्माण होत आहे.सकाळच्या सुमारास हे हरण रहदारी भागात आल्याने कमरेच्या भागाला जखमा दिसत आहे.प्रथम दर्शनी हरणांच्या पिल्लाला धारदार शस्त्राने किंवा शिकारीच्या उद्देशाने मारण्यात आल्याची शक्यता नाकारता येत नाही.
नागरिकांनी घटनेची माहिती मंडळ अधिकारी रंजना तायडे वरणगांव यांना दिली असता त्यांनी तात्काळ वन विभागाला याबाबत कळविले. नंतर तत्काळ वनविभागातील मुक्ताईनगर येथील अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले असून त्यांनी पंचनामा केला असून या प्रसंगी वनविभागाचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी मृत हरणाला जळगांव येथील पशु वैद्यकीय अधिकारी यांच्या कडे घेवून जावून शवविच्छेदन केले.
SHARE

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.