आपला जिल्हा

भुसावळात महसूल विभागाची कारवाई !

प्रतिनिधी औल्विन स्वामी / कालू शाह

भुसावळ / शहरातील जामनेर रोडवरील स्टेट बँक मुख्य शाखेच्या पाठीमागे गेल्या कित्येक दिवसांपासून अवैध गॅस रिफिलिंग व्यवसाय सुरू आहे. याबाबत तहसीलदार नीता लबडे मॅडम यांना गोपनीय माहिती मिळाल्याच्या आधारे महसूल पथक व अधिकारी यांना  (ता.८) जुलै २०२४ रोजी कारवाई करण्यात आदेश दिल्यावरून राजू ऑटो केअर अँड कार वशिंग सेंटर ला दुपारी तीन वाजेच्या दरम्यान रिक्षा मध्ये घरगुती गॅस भरत असतांना महसूल विभागाने कारवाई करीत अवैध गॅस रिफिलिंग चे साहित्य जप्त करीत कारवाई केली.

माहिती अशी की, बाजारपेठ पोलीस स्टेशन हद्दीतील भुसावळ शहरातील जामनेर रोडवरील स्टेट बँक मुख्य शाखेच्या पाठीमागे गेल्या कित्येक दिवसांपासून राजू ऑटो केअर अँड कार वशिंग सेंटरच्या आड अवैध गॅस रिफिलिंग व्यवसाय सुरू असल्याची गोपनीय माहिती तहसीलदार नीता लबडे मॅडम यांना मिळल्यावरून घटनास्थळी महसूल विभागाचे पुरवठा अधिकारी अतुल नागरगोजे व कर्मचाऱ्यांनी सापळा रचून खात्री केली असता संशयित आरोपी शाहरुख खाटीक राहणार आयान कॉलनी, फुटबॉल बिल्डिंग भुसावळ हा रिक्षामध्ये (एच पी) कंपनीचे घरगुती गॅस सिलेंडर नागरिकांच्या जीवास धोका तसेच स्फोटक असणारे वापरत करीत आतांना अवैध गॅस रिफिलिंग करतांना मिळून आले.घटनास्थळी एक कॉम्प्रेसर मशीन,१० गॅस सिलेंडर, एक इलेक्ट्रॉनिक वजन काटा,एक रिक्षा व इतर साहित्य असे लाखो रुपयांचा मुद्देमाल मिळून आला.या कारवाई मुळे शहरातील अवैध गॅस रिफिलिंग करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहे.

सदरची कारवाई तलसीलदार नीता लबडे,पुरवठा अधिकारी अतुल नागरगिजे व कर्मचारी तर बाजारपेठ पोलीस स्टेशनचे कर्मचारी सचिन चौधरी,राहुल वानखेडे यांनी मदत केली.

SHARE

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.