आपला जिल्हा

जुन्या भांडणावरून चाकू हल्ला ; चौघांविरुद्ध गुन्हा दाखल .

पोलीस वार्ता टीम

भुसावळ – शहरातील शिवाजी नगर भागातील महाराष्ट्र किराणा जवळील रहिवाशी मोहम्मद हाशिम मोहम्मद याकूब हे (ता.३१) मे २०२४ रोजी सकाळी साडे अकरा वाजेच्या दरम्यान घरात झोपलेले असतांना घराच्या बाहेर भांडणाचा आवाज आल्याने बाहेर जावून पाहिले असता चौघे जण मागील भांडणाच्या कारणावरून फिर्यादीच्या पत्नी व मुलगी यांना शिवीगाळ करीत होते.शिवीगाळ का करीत आहे याचा जबाब विचारला असता ईश्वर जीवन चौधरी याने त्याचे हातातील भाजीपाला कापण्याचा चाकूने महाराष्ट्र किराणा दुकानाजवळ फिर्यादीच्या डाव्या बाजूला पोटावर व छातीवर हल्ला करून जखमी केले. या घटनेतील संशयित मिलन ईश्वर चौधरी,रोहन ईश्वर चौधरी, बबलू गिरधर चौधरी सर्व राहणार धोबी वाडा, शिवाजी नगर भुसावळ येथील असून चौघांनी फिर्यादी मोहम्मद हाशिम मोहम्मद याकूब (वय.५८) व त्यांची पत्नी तसेच मुलीस शिवीगाळ करून मुलास जिवंत सोडणार नाही अशी धमकी दिली म्हणून बाजारपेठ पोलीस स्टेशनला (ता.९) जुलै २०२४ रोजी चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
SHARE

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.