आपला जिल्हा

भुसावळात झन्ना -मन्ना जुगारावर छापा !

निलेश के फिरके

भुसावळ – शहरातील वाल्मीक नगर ७२ खोली जवळील मोकळ्या जागेत काही लोक स्वतहाचे फायद्यासाठी मांग पत्यावर झन्ना – मन्ना नावाचा पत्ता जुगाराचा खेळ खेळत आहे व खेळवित आहे अशी खात्रीशीर बातमी पोलीस निरीक्षक यांना मिळाली त्या आधारे पथक घटनास्थळी रवाना करून झन्ना -मन्ना जुगारावर पोलिसांनी छापा टाकून सहा जणांना ताब्यात घेतले.
सविस्तर वृत्त असे की,भुसवाळ शहरातील वाल्मीक नगर ७२ खोली मध्ये राहणारा दिपसिंग मोरसिंग ढिकाव याच्या घरासमोर मोकळ्या जागेत काही लोक स्वतहाचे फायद्यासाठी मांग पत्यावर झन्ना – मन्ना नावाचा पत्ता जुगाराचा खेळ खेळत आहे व खेळवित आहे अशी खात्रीशीर बातमी निरीक्षक यांना मिळाली.सदर ठिकाणी पथकास जावुन योग्य ती कारवाई करावी असे कळविल्याने वाल्मीक नगर येथे जावुन काही अंतरावर वाहने थांबवुन सदर ठिकाणीहून पायी पायी बातमीच्या ठिकाणा जवळ पास जावुन बातमीची खात्री केली असता एका घरासमोर मोकळ्या जागेत सहा इसम गोलाकार बसुन झन्ना मन्ना पत्ता खेळत असल्याचे दिसले दिनांक २७/११/२०२२ रोजी रात्री ०९.०० वाजता मिळून आल्याने छापा टाकुन बसलेल्या संशयित आरोपी अनिल रामा सपकाळे वय ४६ वर्ष,सुभाष रामदास तुकेले वय ४० वर्ष, नंदु मनसा खरारे वय ५४ वर्ष,किशोर चंदकी देनवाल वय ६५ वर्ष,चंदन इतवारी धामणे वय ३० वर्ष,दिपकसिंग मोरसिंग ढिक्याव वय ६८ वर्ष सर्व रा.७२ खोली, वाल्मीक नगर,भुसावळ असे सांगुन त्याची क्रमा क्रमाने अंगझडती घेता त्यांच्या अंग झडतीत व खाली जमिनीवर खेळात पडलेले २९५०/- रु. रोख व ५२ पानी लाल रंगाचा पत्याचा कॅट असे जुगार खेळण्याचे साहित्य त्यांच्या कडून मिळुन आल्याने पोलिसांनी पुढील कारवाईसाठी सर्वांना ताब्यात घेतले.पोकॉ प्रशांत रमेश परदेशी यांच्या फिर्यादीवरून बाजारपेठ पोलीस स्टेशनला यांच्या विरुद्ध महाराष्ट्र जुगार अॅक्ट कलम 12 (अ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदरची कारवाई पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांच्या आदेशावरून पोकॉ.प्रशांत परदेशी,पोहेकॉ विजय नेरकर, पोना.तेजस पारसकर,पोना. निलेश चौधरी अशांनी मिळून केली.
SHARE

Related Articles

3 Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.