भुसावळच्या प्राध्यापक माधुरी गुजर ह्या तेजस फाउंडेशन तर्फे राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित.
भुसावळ पोलीस वार्ता टीम

भुसावळ – डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन केंद्र,छत्रपती संभाजीनगर येथे तेजस फाउंडेशन आयोजित राज्यस्तरीय पुरस्कार 2023 मध्ये भुसावळ येथील प्रा माधुरी गुजर नाहटा कॉलेज भुसावळ यांना राज्यस्तरीय पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
यावेळी ज्येष्ठ साहित्यिक डॉ ऋषिकेश कांबळे,चित्रपट अभिनेता व दिग्दर्शक राजू मोरे,ज्येष्ठ साहित्यिक
प्रा डॉ बापूराव देसाई, सिद्धार्थ सोनवणे,नाथ कुमार घोलवाड, डी वी व्व्खिल्लारे उपस्थित होते.
प्रा .माधुरी गुजर ह्या पिक्याथॉन भुसावळच्या चार वर्षापासून राजदूतअसून भुसावळ मधील महिलांच्या शारीरिक,मानसिक व भावनिक आरोग्या करिता विविध उपक्रम आयोजित करीत असतात.यामध्ये 12 ऑक्टोबर 2019 भुसावळ मधील महिलांकरता प्रथम मॅरेथॉन स्पर्धा आयोजित केली तसेच दररोज जवळपास 100 महिलांना सकाळी साडेपाच ते साडेसहा दरम्यान अरेबिक योगाचे प्रशिक्षण देत असतात.
मागील वर्षी १३ जून 2022 पासून ते 13 जुलै आषाढी एकादशी पर्यंत जवळपास 150 महिलांना घेऊन सकाळी साडेचार वाजता वारी काढून रोज आठ किलोमीटर चालण्याचा उपक्रम राबविला व आषाढी एकादशीच्या दिवशी 150 महिलांनी पारंपारिक वेशात माऊली माऊली गाण्यावर विठ्ठलाची आराधना केले,पोलीस विभाग भुसावळ सोबत स्वयंसिद्धां हा विद्यार्थिनी करिता स्वरक्षणासाठी उपक्रम घेतला,महिलांना लेझीम शिकवून गणपती उत्सवामध्ये विविध कार्यक्रमांमध्ये भाग घेण्यास प्रोत्साहित केले, तसेच नवरात्री उत्सवात 300 महिलांना गरबा चे प्रशिक्षण दिले. अशाप्रकारे महिलांच्या सुप्त कला गुणांना वाव मिळावा यासाठी विविध उपक्रम घेतले,
तसेच भविष्यात विद्यार्थिनींना व महिलांना संरक्षणासाठी कराटे प्रशिक्षण आयोजित करण्याचा मानस आहे.
या पुरस्कार सोहळ्यासाठी महाराष्ट्रातून अनेक शिक्षक प्राध्यापक लेखक कवी ग्रामसेवक यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे प्रास्ताविक महेंद्र तुपे यांनी केले तर सूत्रसंचालन पंकज शिंदे यांनी केले व आभार प्रदर्शन मेघा डोळस यांनी केले.