आपला जिल्हा

दोन परीवारात वाद ; चोपड्यात युवकांवर हल्ला

चोपडा शहरात धावपळ, दुकानांचे शटर बंद, पोलिसांनी परिस्थिती आणली नियंत्रणात

चोपडा प्रतिनिधी.- गेल्या दहा ते बारा दिवसांपूर्वी शहरातील साने गुरुजी वसाहत मधील दिन परिवारातील मुला – मुलीचा वाद आहे  त्यांनी विवाह केल्याने ते दोघेही शहराबाहेर आहेत. परंतु त्या दोघांच्या विवाह साठी आकाश संतोष भोई यांनी मदत केल्याच्या कारणावरून दिनांक २० रोजी दुपारी दीड ते दोन वाजेच्या सुमारास काही तरुणांनी आकाश भोई याच्यावर शस्त्राने हल्ला चढवला. चाकूने मानेवर वार केले व आसारीने डोक्यावर वार केले. त्यात आकाश भोई हा जबर जखमी झाला असून त्यास परिस्थिती उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलेले आहे. सदर घटनेचे वृत्त शहरात वाऱ्यासारखे पसरले.

शहरातील सर्व लहान मोठे व्यवसायिकांनी दुकानांचे शटर बंद केली. तसेच शहरातील शाळांमधील मुलांना पालकांनी घरी घेऊन जाण्यासाठी गर्दी केली. परंतु पोलिसांना घटना माहिती झाल्याबरोबर घटनास्थळी डीवायएसपी कृषीकेश रावळे, चोपडा शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री के. के. पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष चव्हाण, अजित साबळे यांनी घटनास्थळी पोलीस कुमक घेऊन परिस्थिती नियंत्रणात आणली आहे. दंगल सदृश परिस्थिती नसताना मात्र दंगल झाली अशी अफवा वाऱ्यासारखी पसरल्याने क्षणार्धात चोपडा शहरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले. त्यानंतर मुख्य बाजारपेठ रस्त्यावरील सर्वच दुकानांची शटर बंद झाल्याने शुकशकाट दिसून आला. एक ते दीड तासाने दुकाने व्यवसायिकांनी पुन्हा सुरू करण्याचा प्रयत्न केला.काही दुकाने सुरूही झाली होती.

परंतु चार वाजेनंतर पुन्हा डी वाय एस पी कृषीकेश रावळे यांनी दुकाने बंद करण्याचे आवाहन करण्यात आले. वातावरण चिघळू शकते असे डीवायएसपी कृषीकेश रावळे यांनी दुकान चालकांना सांगितल्याने चार वाजेनंतर पुन्हा छोटे-मोठे व्यवसायिकांनी दुकाने बंद केले. सध्या सव्वाचार वाजेपर्यंत चोपडा शहरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले असून वैयक्तिक कारणावरून झालेल्या वादामध्ये कोण कोण समाविष्ट आहे याबाबत पोलीस कसून चौकशी करीत आहेत.मात्र असे असले तरी बस स्टँड आणि गजबजलेल्या छत्रपती शिवाजी महाराज चौक भागात जनजीवन पूर्ववत सुरू असल्याचे दिसून आले.

जळगाव जिल्हा- प्रतिनिधी- विनायक पाटील

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.